शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी फलटण तालुका पेटल्यावर यायचे होते का?

By admin | Updated: March 11, 2015 00:12 IST

पत्रिका नाट्य : रामराजेंच्या उद्गारानंतर शिवसेनेचा पलटवार

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकिय इमारत लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेत नाव नसल्याने मानापमान नाट्य व दोन वेगवेगळ्या निमंत्रणपत्रिकेचे गौडबंगाल काय? याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांचे नाव डावलून त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने जाहिर निषेध करीत असल्याचे पत्रक शिवसेनेने काढले आहे. त्यातच नगरपरिषदेच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर पालकमंत्र्याना आमदार रामराजें यांनी पत्रक काढून त्यांच्या जखमेवर मिठ चोळले.लोकार्पण सोहळ्याच्या दोन वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्याने गोंधळात अजूनच भर पडली आहे. वाटण्यात आलेल्या पहिल्या पत्रिकेत जिल्हाधिकारी, नगर रचनेचे संचालक, सहायक संचालक, मुध्याधिकारी यांच्यासह मान्यवरांची नावे होते. परंतु नंतर वाटण्यात आलेल्या पत्रिकेत लक्ष्मणराव पाटील यांचे नाव वाढवून या चौघांचीही नावे काढण्यात करण्यात आली. याबाबत शिवसेनेने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की सत्ताबदल झाल्याचे रामराजे यांच्या पचनी पडत नसून द्वेषापोटी पालकमंत्र्यांना डावलण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही आमदार व सर्व नगराध्यक्षांची नावे पत्रिकेत छापण्यात आली आहेत. फलटण नगरपरिषदेच्या घोटाळ्याचे पुरावा असलेल्या कागदपत्रांचे गोडाऊन जाळल्यानंतर पालकमंत्र्यांना भेट देणे आवश्यक होते. व या प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. पालकमंत्र्यांनीे नगरपरिषद जळाल्यानंतर यायचे का? तालुका पेटल्यावर यायचे हे रामराजेंनी स्पष्ट करावे. मंत्रीपदाच्या लोभापोटी आपल्या वाट्याचे पाणी बारामतीकरांना देऊन निम्मा तालुका होरपळत ठेवला आहे. आता निदान आगी लावण्याचे काम करू नये रामराजे यांनी आपली राजकीय उंची दाखवून दिल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.सेनेचे तालुकाध्यक्ष शंभुराज खलाटे यांनी आपल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे की अवकाळी पाऊस, दुष्काळ, पाणीटंचाई यासारखे अनेक प्रश्न समोर असताना त्याबाबत माहिती घेऊन संबंधितांना सूचना देऊन सर्व सामान्य लोकांना दिलासा देणे आवश्यक असताना पालकमंत्री अशा किरकोळ घटनांची पाहणी करतात हे दुर्दैवी आहे. (प्रतिनिधी)नगरपरिषदेमधील छोट्याशा अगीच्या पाहणीसाठी येण्यापूर्वी पालकमंत्र्यानी आगाऊ सूचना दिली असती तर त्यांचे यथोचित स्वागत करुन सर्व माहिती दिली असती.-रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार