लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : पारसी पॉइंटदरम्यानच्या रस्त्यालगतच्या फुटपाथवरील बाकड्यावर बसून मोबाइलवरील मेसेज पाहत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने हातातील मोबाइल घेऊन धूम स्टाइलने पसार झालेल्या चोरट्यास पाचगणी पोलिसांनी गतिमान तपास करीत जेरबंद केले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी विकास पद्माकर अभ्यंकर (वय ५४, रा. संजीवन विद्यालय पाचगणी, ता. महाबळेश्वर) हे पारशी पॉइंटदरम्यानच्या रस्त्यावरील फुटपाथवरील बाकड्यावर दि. २ जुलै रोजी साडेतीनदरम्यान मोबाइलवर मेसेज पाहत अचानक विनानंबर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला होता.
त्यानुसार पोलिसांच्या तपासात दोन अज्ञात आरोपी निष्पन्न झाले. वाई येथे चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोबाइल व दुचाकी जप्त करून आरोपींना अटक करून वाई येथील न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.