शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘धोम-बलकवडी’ ओव्हरफ्लो!

By admin | Updated: August 3, 2016 00:19 IST

कोयनेत ६८.५१ टीएमसी पाणी : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; अनेक पूल पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत

सातारा : मंगळवारपासून सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला असून, पश्चिम भागासह पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यातही ओढे-नाले तुडुंब वाहू लागले आहेत. अवघ्या चोवीस तासांत तब्बल ७.०८ टीएमसी इतका पाणीसाठा वाढण्याचा विक्रमही यंदाच्या मोसमात कोयना धरणाने केला असून, वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणही ओव्हरफ्लो झाले. दरम्यान, अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून महाबळेश्वर, पाचगणीसह अनेक शहरांचे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला असताना मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ७.०८ टीएमसीने वाढ झाली. धरणात ६८.५१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाटण तालुक्यांत तर पावसाने थैमान घातले. महाबळेश्वर येथे मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चोवीस तासांत ३६२ मिलिमीटर, कोयना येथे १७८, तर नवजा येथे १८४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सातारा शहरातही मंगळवारी दिवसभर जलधारांचे बरसणे सुरू होते. पावसाचे पाणी सखल भागात साचल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. सायंकाळनंतर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या कास परिसरातही मंगळवारी दमदार पाऊस झाला. (प्रतिनिधी) धबधबे कोसळू लागले सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे असलेल्या कोरेगाव, खटाव परिसरातही मंगळवारी पावसाने हजेरी लावली. या पावसात यंदा प्रथमच या भागातील धबधबे, ओढे व नाले खळाळून वाहू लागलेत. काही ठिकाणी गटारांतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदीत असले तरी शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सात हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग धोम-बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून प्रतिसेकंद सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग धोम धरणात सुरू आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद ३१ हजार ४०४, तर कण्हेर धरणात १२ हजार ६९९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मोरणा, तारळी, केरा तुडुंब पाटण तालुक्यातील मोरणा, तारळी, केरा, काजळी, काफना, वांग या नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे डोंगरकपारीतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडता आले नाही. अनेक ठिकाणी शेतीमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने शेती जलमय झाली. अनेक पूल पाण्याखाली वाई तालुक्यातील कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने चिंधवली येथील कृष्णा नदीवरील पूल मंगळवारी पाण्याखाली गेला. तसेच पाटण तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पांढरेपाणी, निवी, कसणी या गावांना वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. वीजवाहिन्या तुटल्याने अनेक गावे अंधारात गेली आहेत.