शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

धोंडेवाडीचे सात ठार

By admin | Updated: September 27, 2015 00:29 IST

एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात : मृतांमध्ये चार महिला व दोन मुलांचा समावेश

खालापूर : सातारा जिल्ह्याच्या जावली तालुक्यातील धोंडेवाडी या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी गेलेल्या धोंडे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला. गणेशोत्सव साजरा करून मुंबईला परत येत असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोधिवली जवळ झालेल्या भीषण अपघातात या कुटुंबातील सातजण ठार झाले. मृतांमध्ये चार महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या या दोघांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशोत्सवासाठी गावाला गेलेले धोंडे कुटुंबीय (एमएच ०४ एवाय १८५०) क्वॉलिसने नवी मुंबईत येत असताना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या क्वॉलिसचा टायर फुटला. त्यामुळे क्वॉलिस पलीकडच्या मार्गावर जाऊ न (एमएच ०४ एफ ३२५८) या डम्परवर जाऊ न आदळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. अपघातात धर्मराज दत्तू धोंडे (४५), वेदांत धर्मराज धोंडे (१०), सुनिता धोंडे (४०), अश्विनी धोंडे (१५), शुभम पवार (७), सखुबाई पवार (५०), व चित्रा धोंडे (४०) यांचा मृत्यू झाला तर प्रतिक धोंडे (१६) व पुजा धोंडे (१५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला. त्या ठिकाणी गेल्या महिन्याभरात झालेल्या विविध अपघातांमध्ये १० जण ठार झाले आहेत. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर) गरुनाथ साठेलकर यांनी काढले मृतदेह अपघात झाल्यानंतर पोलीस व आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, अपघातानंतर मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यास कुणीही धजावत नव्हते. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी दाखल झालेले पत्रकार व अपघातग्रस्तांना नेहमीच मदत करणारे गुरुनाथ साठेलकर यांनी गाडीतील छिन्नविचिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या सहायाने अपघातग्रस्त कार बाजूला करण्यात आली. गावावर शोककळा कुडाळ : जावळी तालुक्यातील धोंडेवाडीत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी एक्स्प्रेस-वेवरील अपघाताची वार्ता येऊन धडकली अन् गावावर शोककळा पसरली. येथील धर्मराज दत्तू धोंडे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे कांदा-बटाट्याचा व्यवसाय करतात. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त ते सहकुटुंब धोंडेवाडी गावी आले होते. सण साजरा करून स्वत:च्या कारमधून सोमवारी परत निघाले होते. त्यांच्यासमवेत पत्नी लक्ष्मी, चार वर्षांचा मुलगा वेदांत, भावजय, पुतण्या प्रतीक, चुलत बहीण सखुबाई पवार, भाचा शुभम होते. त्यांच्या वाहनावर काळाने घाला घातल्याचे समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली. यामधील मृतांची माहिती उशिरापर्यंत मिळत नसल्याने एकमेकांना फोनाफोनी करून विचारणा केली जात होती. धर्मराज धोंडे यांच्या आई-वडिलांना घेऊन त्यांचे नातेवाईक मुंबईच्या दिशेने रवाना झाले.