शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या चळवळीला ढोलांचा सलाम!

By admin | Updated: October 11, 2015 00:07 IST

गांधी मैदानात ‘ढोलोत्सव’ रंगला : शेकडो कलाकारांचा सहभाग; ढोलांच्या गजरात ताशांचा कडकडाट !

सातारा : पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात विसर्जन मिरवणूक काढून सातारकरांनी इतिहास घडविला. तमाम सातारकरांना मानाचा मुजरा करण्यासाठी ‘लोकमत आणि गंधतारा ढोल्स’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ढोल महोत्सवाला शनिवारी संध्याकाळी गांधी मैदानावर उदंड प्रतिसाद मिळाला. तीनशेहून अधिक कलाकारांच्या संचाने हे सादरीकरण केले. ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन सारस, सुर्वेज हॉटेलचे माधव सुर्वे, गणेश घोलप व इतर मान्यवर उपस्थित होते. साताऱ्यात पूर्वंपार ढोल-ताशांची सेवा करणाऱ्या दीक्षित करंडेढोल मंडळाने आपल्या वादनाने या महोत्सवाची सुरुवात केली. सातारा शहरातील सहा मंडळांच्या उपस्थितीने या महोत्सवाला रंगत आणली. वर्षानुवर्षे पारंपरिक वाद्यांची सेवा करणाऱ्या मंडळांचा पहिल्यांदाच असा गौरव करण्यात आला. ‘गंधतारा ढोल्स’च्या संचात ८० महिला आणि ३० पुरुष आहेत. लयबद्ध वादन, ढोलावर थाप आणि ताशांचा कडकडाट अशा नादावणाऱ्या वातावरणात रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगला होता. सातारकरांनीही अखेरपर्यंत थांबून कलाकारांना प्रोत्साहन दिले. टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांनी गांधी मैदान परिसर दणाणून गेला. या महोत्सवासाठी शार्दुल टोपे, सलमान सय्यद, प्रतिक जाधव, सौरभ शिंदे, रोहित सावंत, चेतन यादव, सर्वेश खांडेकर, आकाश गायकवाड, आकाश निंबाळकर, आकाश पिसाळ, महेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम केले. विधायक पत्रकारितेचे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’ने यंदा डॉल्बी सिस्टीम बंदीचा नारा दिला होता. त्यातून तयार झालेल्या एल्गाराने यंदा डॉल्बी सिस्टीमचा आवाज सातारा जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे सुखावह चित्र पहायला मिळाले. विधायक कामात सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक युवकांनी स्वत: पुढाकार घेऊन काही ढोल पथकांची स्थापना केली. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण या रगाड्यात असलेल्या तरुणाईने रोज ढोलाच्या सरावासाठी चार तास काढले. (प्रतिनिधी) साताऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच! सातारा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ढोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे हा महोत्सव नेमका कसा असणार, याविषयी सातारकरांच्या मनात उत्सुकता होती. गांधी मैदानावरील व्यासपीठावर केलेली आकर्षक मांडणी आणि विद्युत रोषणाईने कार्यक्रमात रंगत आणली. ८० महिला अन् ३० पुरुष यांचा समावेश ‘गंधतारा ढोल्स’च्या संचात ८० महिला आणि ३० पुरुष आहेत. लयबद्ध वादन, ढोलावर थाप आणि ताशांचा कडकडाट अशा नादावणाऱ्या वातावरणात शनिवारी रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगला होता. हजारो सातारकरांनीही अखेरपर्यंत थांबून या कलाकारांच्या पारंपरिक कलेला जोरदार प्रोत्साहन दिले. नेहमी डॉल्बीवरच्या गाण्यांना मिळणारा टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्या शनिवारी मात्र ताशांच्या कडकडाटाला मिळाला. अन् गांधी मैदान परिसर दणाणून गेला.