शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आज ‘ढोल महोत्सव’

By admin | Updated: October 9, 2015 23:39 IST

गांधी मैदान : सातारकरांसाठी सायंकाळी खास पर्वणीचे आयोेजन

सातारा : पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात निघालेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे गोडवे आजही सातारा शहरात गायले जात आहेत. याच सातारवासीयांसाठी ‘गंधतारा ढोल्स’च्या वतीने शनिवारी सायंकाळी ६ वाजता ढोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विधायक पत्रकारितेचे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’ने डॉल्बी सिस्टीम बंदीचा नारा दिला. त्याविषयी सुमारे एक वर्षे प्रशासकीय, गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांचा पाठपुरावाही ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आला. त्यातून तयार झालेल्या एल्गाराने यंदा डॉल्बी सिस्टीमचा आवाज सातारा जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे सुखावह चित्र पहायला मिळाले. विधायक कामात सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक युवकांनी स्वत: पुढाकार घेऊन काही ढोल पथकांची स्थापना केली. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण या रगाड्यात असलेल्या तरुणाईने रोज ढोलाच्या सरावासाठी चार तास काढले. त्यांच्या या कष्टाचे फळ सातारकरांच्या चेहऱ्यावरून पहायला मिळाले. कित्येक दशकांनी अनेक ज्येष्ठांचे पाय चक्क विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने वळालेलेही पहायला मिळाले.सातारकरांचे अलोट प्रेम आणि पारंपरिक वाद्यांप्रती असलेल्या निष्ठेपायी ‘गंधतारा ढोल्स’च्या वतीने शनिवार, दि. १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी मैदान येथे ढोल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विसर्जन मिरवणूक चुकलेले आणि पुन्हा एकदा ढोलांच्या वातावरणाचा आनंद देण्यासाठी ‘गंधतारा’चा ताफा ढोल वाजवणार आहे. रसिक सातारकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’ व ‘गंधतारा’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सातारकरांनी यंदा पारंपारिक वाद्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे आम्ही खुपच भारावून गेलो आहे. म्हणूनच साताऱ्याच्या इतिहासात प्रथमच आम्ही ढोल महोत्सवाचे आयोजन करत आहे. सातारकर यालाही प्रतिसाद देतील, अशी आशा आहे. - शार्दुल टोपे, गंधतारा ढोल्स, सातारा