शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देऊर ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध

By admin | Updated: October 18, 2015 23:34 IST

कोरेगाव तालुका : शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नेत्यांचा एकमुखी निर्धार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याला राजकीय दिशा देणाऱ्या देऊरकरांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर १९५२ नंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देऊर गावचे पालकत्व घेतल्याने गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती गावाअंतर्गत असलेल्या सर्वच राजकीय गटांतील कार्यकर्त्यांना केली होती. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेला सर्वांनीच पाठिंबा देत शनिवारी शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवड बिनविरोध झाली. १९५२ मध्ये देऊर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. १९९५ ते २००० या काळात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर कदम हे गावचे सरपंच तर चेतनसिंग कदम-पाटील हे उपसरपंचपदी कार्यरत होते. या काळात त्यांनी देऊर गावचा विकास गतिमान केला होता. यामुळे २००० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना गावाने पुन्हा बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर आता १५ वर्षांनंतर देऊरची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार दि. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. एकूण ११ जागांसाठी वार्ड क्र. १ मधून संगीता अरुण थोरात, अजित चंद्रसेन कदम, नंदा तानाजी काकडे. वार्ड क्र. मधून प्रदीप महादेव कदम, नंदा गुलाबसिंग कदम, वसंत हणमंत जाधव. वार्ड क्र. ३ मधून बाळासाहेब तानाजी कदम, नीलिमा विजय कदम, शुभांगी उमेश देशमुख. तर वार्ड क्र. ४ मधून राजेंद्र बळीराम कदम, धनश्री अमोल कुंभार या ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. अर्ज भरल्यानंतर देऊर ग्रामस्थांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करीत गावातून गुलाल-फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. यावेळी धनसिंग कदम, किसनराव कदम, अ‍ॅड. संजीव कदम, गुलाबसिंग कदम, हंबीरराव कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)गाव दत्तक...देऊर गावच्या विकासासाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. या गावाच्या विकासासाठी प्रत्येकवर्षी निधी मिळणार आहे. यामुळे प्राधान्याने गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच गावास जोडणारे आसनगाव, बनवडी, बिचुकले, दहिगाव या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे गावाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत आहे.