पिंपोडे बुद्रुक : ‘विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अनेक आपत्तीचा सामना करत शासन आपल्या स्तरावर विविध विकासाची कामे करीत असते. कोरोनासारखे संकट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातही विकासकामे सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करीत आहोत. अशा परिस्थितीतही न थांबता विकासकामे यापुढेही नियमित सुरू राहतील,’ असे प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे करावयाच्या तीन कोटी ४८ लाखांच्या विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ, कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश धुमाळ, सरपंच नैनेश कांबळे, सुरेशराव साळुंखे, अशोकराव लेंभे, रामभाऊ लेंभे, बाळासाहेब भोईटे उपस्थित होते.
संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘वसना नदीच्या पूर्वेकडील भागाला नांदवळ धरणातून पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरेगावचा उत्तर भाग राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे. या भागाने प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीला भरभरून दिले आहे. स्थानिक पातळीवर मतभेद असले तरी ते बाजूला ठेवता यायला हवेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येक गावात भरीव विकासकामे केली आहेत. यापुढील काळात निधीची कमतरता भासू देणार नाही.’
यावेळी संजय धुमाळ, कृषी सभापती मंगेश धुमाळ, अशोकराव लेंभे, दीपक गार्डी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अमृतराव जायकर, गजानन महाजन, जितेंद्र जगताप, भूषण पवार, जनार्दन निकम, भरत साळुंखे, सुधीर साळुंखे, रामबाबा लेंभे, धनसिंग साळुंखे, जियाजी लेंभे, रविराज लेंभे, मछिंद्र केंजळे, बाळासाहेब गार्डी, श्यामराव साळुंखे, लहुराज गार्डी व ग्रामस्थ उपस्थित होते. विकास साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती संजय साळुंखे यांनी आभार मानले. विकास साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती संजय साळुंखे यांनी आभार मानले.
२८पिंपोडे बुद्रुक
पिंपोडे बुद्रुक येथे पाण्याच्या टाकीला जागा दिल्याबद्दल श्यामराव साळुंखे यांचा सत्कार करताना संजीवराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण, समवेत संजय साळुंखे, विकास साळुंखे, नैनेश कांबळे उपस्थित होते.
2- शुभारंभ प्रसंगी मान्यवर