शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक वाण वापरले तर शेतीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:42 IST

लोणंद : ‘देशाची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात शेती व्यवसाय वाढला नाही. शेतीत बदल करून नवीन संकरित बियाणे, अवजारे, आधुनिक पिकांचे वाण व शेती जोड व्यवसाय स्वीकारले पाहिजेत. कमी पाण्यावर व कमी वेळेत येणाºया उसाच्या जाती आल्या तरच महाराष्ट्र नंबर एकवर जाईल,’ असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त ...

लोणंद : ‘देशाची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात शेती व्यवसाय वाढला नाही. शेतीत बदल करून नवीन संकरित बियाणे, अवजारे, आधुनिक पिकांचे वाण व शेती जोड व्यवसाय स्वीकारले पाहिजेत. कमी पाण्यावर व कमी वेळेत येणाºया उसाच्या जाती आल्या तरच महाराष्ट्र नंबर एकवर जाईल,’ असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.लोणंद येथे आयोजित शरद कृषी महोत्सव व प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी शिक्षण सभापती राजेश पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, उदय कबुले, सभापती मकरंद मोटे, राजेंद्र तांबे, तेजस शिंदे, डॉ. नितीन सावंत तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, ‘कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेती, कला, विज्ञान क्षेत्रात नवीन काही करण्याचा प्रयत्न खंडाळा तालुक्याने केला आहे. शेती क्षेत्रात आधुनिकता येण्यासाठी प्रदर्शन महत्त्वपूर्ण आहे. खंडाळा तालुक्याने माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. सातारा जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्कार झाला असताना केवळ लोणंदकरांचे प्रेम गप्प बसू देत नसल्यानेच हा दुसरा सन्मान झाला, त्याचा आदर आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन या तालुक्याने मला साथ दिली.’मकरंद पाटील म्हणाले, ‘या महोत्सवामुळे खंडाळा तालुक्याचे स्वप्न साकार झाले. कृषी, सहकार, राजकारणासह सर्वच क्षेत्रात शरद पवार यांनी ठसा उमटविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचं कामकाज उत्तम सुरू आहे. कृष्णेचं पाणी आल्यानं खंडाळ्याचा दुष्काळ हटला. शेती पाण्याबाबत स्वयंपूर्णता आली. आता औद्योगिकरण झाल्याने हा सर्वात प्रगत तालुका होईल.’मनोज पवार म्हणाले, ‘या भागात पाणी पोहोचल्याने आता शेती समृद्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रदर्शनातून मिळेल. शेतकºयांसाठी जिल्हा परिषदेतर्फे सुविधा देण्यात येणार आहेत.’यावेळी डॉ. नितीन सावंत, दत्तात्रय बिचकुले, रमेश शिंदे, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, दीपाली क्षीरसागर, सागर शेळके, संभाजी घाडगे, भिकूदादा कुरणे, गजेंद्र मुसळे यांच्यासह लोणंद, वाई, फलटण, कोरेगाव पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. नितीन सावंत यांनी प्रास्ताविक केले. हणमंत शेळके यांनी आभार मानले.मकरंद पाटलांमुळे गती‘खंडाळ्यासह दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी रामराजेंनी मंत्री काळात पुढाकार घेतला. मकरंद पाटील यांनी त्याला गती दिली. त्यामुळेच कृष्णेचं पाणी पोहोचू शकले. आता सत्तर टक्के जमीन पाण्याखाली आल्याने बारामतीपेक्षा अधिक विकास होईल.’ कृषी महोत्सव दरवर्षी होणार असल्याने परदेशातील नवीन तंत्रज्ञान पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.