मलकापूर : मलकापूरने आत्तापर्यंत देशाला व राज्याला अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम दिले. गेल्यावर्षी ‘एक नगरपालिका, एक गणपती’चा निर्णय घेणारी पहिली नगरपालिका ठरली होती. गेल्यावर्षीप्रमाणेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करून शहरातील मंडळांनी यावर्षीही ‘एक पालिका, एक गणपती’ उपक्रमाचा निर्धार करावा,’ असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत पालिका पदाधिकाऱ्यांसह बहुतांशी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सार्वजनिक गणेशोत्सव अनुषंगाने आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, शिवसेना कऱ्हाड दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशिद, विरोधी पक्षनेते अजित थोरात, भाजपचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष राजू मुल्ला, मनसेचे दादासाहेब शिंगण, गीतांजली पाटील, सागर जाधव, समीर तुपे, जयंत कुराडे यांच्यासह शहरातील पन्नासहून अधिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात १४४ कलमानुसार सर्व बंधने लागू केली आहेत. गणेश मूर्ती आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कोणत्याही उपक्रमासाठी पाचपेक्षा जास्त व्यक्ती गोळा करण्याचे बंधन आहे. मिरवणूक नाही, वाद्य, सजावट, देखावे, रस्त्यावर स्थापना करता येणार नाही. सक्तीने वर्गणी नाही. चार व्यक्तींच्या उपस्थितीतच आरती अशी बंधने शासनाने घातली आहेत. त्यामुळे नेहमी जे उपक्रम राबवले जात होते, ते राबवता येत नसतील, तर सर्वांच्या भल्यासाठी ‘एक नगरपालिका, एक गणपती’ उपक्रम राबवावा.
शिंदे म्हणाले, ‘मलकापूरवासीयांनी अनेक योजना यशस्वी केल्या. एक पालिका, एक गणपती करून गेल्यावर्षी राज्यात आदर्श निर्माण केला होता. यावेळीही सर्वजण सहकार्य करणार, याची मला खात्री आहे.’
यावेळी उपअधीक्षक रणजित पाटील, अजित थोरात, राजेंद्र यादव यांनी या उपक्रमास पाठिंबा जाहीर करून प्रमुख मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे अवाहन केले. ज्ञानदेव साळुखे यांनी सूत्रसंचालन केले. नगराध्यक्ष नीलम येडगे यांनी आभार मानले.
चौकट
नागरिकांच्या भल्यासाठी निर्णय
‘एक पालिका, एक गणपती’ उपक्रमाला गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय सर्वांनी घेऊया, अशा प्रतिक्रिया बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
फोटो ०२मलकापूर
मलकापूर येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीस पोलीस अधिकाऱ्यांसह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. (छाया : माणिक डोंगरे)
020921\img_20210902_160134.jpg
फोटो कॕप्शन
सार्वजनिक गणेशोत्सव अनुषंगाने मलकापूरात शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांसह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व शहरातील ५० वर मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. (छाया माणिक डोंगरे)