शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापशीकरांचा ‘ओढाजोड’चा निर्धार

By admin | Updated: May 24, 2017 23:17 IST

कापशीकरांचा ‘ओढाजोड’चा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कआदर्की : फलटण पश्चिम भागातील कापशी गावाने दुष्काळाचे चटके अन् पाण्यासाठी रात्र जागून काढत असताना पाण्याचे महत्त्व ओळखून श्रमदानातून १० वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा वाढला. त्यामुळे ओढ्याला वाहून जाणारे पाणी ओढा जोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला शासनाने मंजुरी देऊन कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांचे हस्ते करण्यात आला. कापशी, ता. फलटण गावाला दहा वर्षांपूर्वी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी गावातील तरुणांनी एकत्र येऊन श्रमदानातून भूमिगत, गॅबियन, सिमेंट बंधारे, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून बांधले. यावेळी प.पू. रविशंकर यांनी कापशी गावास भेट दिली होती.बंधाऱ्यामुळे कापशी गावचा पाण्याचा प्रश्न मिटला होता. परंतु कापशी गावचा काही भाग कोरडा राहत होता. त्या दरम्यान तीन वर्षांपूर्वी धोम-बलकवडीचे पाणी कापशीच्या ओढ्याला आलेने बंधारे तलाव भरुन वाहून जात होते. त्यासाठी शासनाकडे कापशी ग्रामस्थानी ओढा जोड प्रकल्प राबवण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. त्याची पहाणी व सर्वेक्षण करण्यात आले.ओढा जोड प्रकल्पामुळे ४५० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने शासनाने फेबु्रवारी १७ मध्ये प्रकल्पास मंजुरी १६ लाख ९३ हजार रुपये मंजूर केले. त्यामुळे कापशी, टाकोबाईचीवाडी, सासवड व फलटण फायदा होणार आहे. सातारा व फलटण तालुक्यातील पहिला ओढा जोड प्रकल्पास शासन १०० टक्के खर्च करीत आहेतकार्यक्रमास प्रा. सुभाषराव धुमाळ, पंचायत समिती सदस्य प्रतिभा धुमाळ, विनायक अनपट, दादासो खताळ, सरपंच मंदा सूळ, महेश अनपट, कुणाल झणझणे, विकास खताळ, दीपक कदम, श्रीरंग झणझणे, शाहूराज झणझणे, मंगेश वर्पे, भगवान कदम, यशवंत कदम, कापशी, टाकोबाईचीवाडी, सासवड ग्रामस्थ उपस्थित होते.