शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान कार्ड असूनही ‘ते’ मतदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:19 IST

सातारा : तृतीयपंथी म्हणून स्वतंत्र मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या नोंदी मतदान ओळखपत्रावरही येणं अपेक्षित असतं. सातारा जिल्ह्यात तर ६३ जणांकडे ...

सातारा : तृतीयपंथी म्हणून स्वतंत्र मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या नोंदी मतदान ओळखपत्रावरही येणं अपेक्षित असतं. सातारा जिल्ह्यात तर ६३ जणांकडे तृतीयपंथी म्हणून मतदान ओळखपत्र आहे. मात्र, मतदार यादीत नाव असल्याची खात्री न केल्याने शासन दरबारी अवघ्या १७ जणांचीच नोंद झाली आहे. त्यामुळे फक्त १७ तृतीयपंथीयांना माढा आणि सातारा मतदार संघात मतदान करता येणार आहे.सामाजिक दडपण, ओळख लपविण्याचा प्रयत्न आणि तृतीयपंथी म्हणून समाजातून होणाऱ्या प्रश्नांचा भडीमार टाळण्यासाठी अनेक तृतीयपंथी स्वत:ला पुरुष म्हणवतात. या सामाजिक घुसमटीमुळे अस्वस्थ होणारे अनेकजण तृतीयपंथीयांसाठी काम करणाºया संस्थांशी जोडले गेले आहेत.या संस्थांमध्ये येऊन त्यांनी स्वत:ला तृतीयपंथी म्हणून घोषित केले आहे; पण ही बाब सार्वजनिक होऊ नये, यासाठीची गोपनियताही जपली. काहींनी मात्र समाज आणि नातेवाइकांना झुगारून आपल्या मनाचा कौल ऐकून स्वत:ला तृतीयपंथी म्हणून जाहीर केलं. तृतीयपंथी व वेश्या व्यवसाय करणाºया महिलांकरिता काम करणाºया ‘संग्राम’ या संस्थेकडे जिल्ह्यात सुमारे ६७ जणांनी तृतीयपंथी म्हणून स्वत:ची अधिकृत नोंद केली आहे.यातील ६३ जणांना तृतीयपंथी म्हणून मतदान ओळखपत्रही शासनाकडून प्राप्त झाले आहे. मात्र, शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची संख्या अवघी १७ दिसत आहे.खासगी संस्था आणि शासकीय यंत्रणेतील ही तफावत मोठी दिसतेय. त्यामुळे ६३ पैकी अवघ्या १७ जणांची नोंद शासनाकडे असेल तर उर्वरितांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे.ओळख लपविण्याचा प्रयत्नतृतीयपंथीयांसाठी काम करणाºया काही संस्थांकडील नोंदणी पाहिल्या. त्यावेळी त्यांच्याकडील आणि शासनाकडे उपलब्ध आकडेवारीत तफावत आढळते. याचं मुख्य कारण ओळख लपविण्याचा प्रयत्न असेही सांगण्यात येत आहे. जे तृतीयपंथी साडी नेसतात, त्यांनी महिला म्हणून आणि जे पुरुषांसारखे कपडे घालतात त्यांनी पुरुष म्हणून नोंद केल्याचीही माहिती पुढे येत आहे.मतदान ओळखपत्र दिल्यानंतर मतदार यादीत नाव तपासण्याची जबाबदारी संबंधित मतदारांची असते, अशी सूचनाही त्या ओळखपत्रावर दिलेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तृतीयपंथी अनेक ठिकाणी भटकंती करत असतात. त्यामुळे त्यांना एका ठिकाणी संपर्क करणं अवघड जातं. बहुदा याच कारणामुळे मतदार नोंदणी कार्यक्रमात ते ट्रॅक झाले नाहीत. परिणामी मतदान ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव न तपासल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.तालुक्यातीलमतदारवाई २कोरेगाव ०कºहाड उत्तर १कºहाड दक्षिण २पाटण ३सातारा ८फलटण १माण ०