शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

आसमंत उजळवून तरुणाई देणार सरत्या वर्षाला निरोप!

By admin | Updated: December 25, 2014 00:14 IST

ज्योत से ज्योत : दहशतवादाचा धिक्कार करण्यासाठी एकतीस डिसेंबरला विद्यार्थी साताऱ्यात काढणार ‘कँडल मार्च’

सातारा : एकतीस डिसेंबरचा संबंध तरुणाईशी जोडला जातो तो बहुधा नशेच्या माध्यमातून. ‘क्लासमेट’ होतात ‘ग्लासमेट’. पण नानाविध समस्यांनी अवघं जगच लडखडत असताना तरुणांनी दोन्ही पायांवर ताठ उभं राहूनच नव्या वर्षात पदार्पण केलं पाहिजे, या उदात्त भावनेतून दोन विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आणि पाहता-पाहता ठिणगीचा वणवा झाला.दहशतवादी पेशावरच्या शाळेत घुसतात आणि सव्वाशे निरागस मुलांचं शिरकाण करतात, ही दृष्यं टीव्हीवर पाहून कमालीच्या व्यथित झालेल्या वैष्णवी कारंजकर आणि अंकिता साळुंखे यांनी मित्र-मैत्रिणींंना साद घातली. व्हॉट्स-अप, फेसबुकवरून ‘मेसेज’ फिरले. पाहता-पाहता विविध कॉलेजमधले पन्नासेक विद्यार्थी एकवटले. बळी गेलेल्या विद्यार्थ्यांशी विद्यार्थी म्हणून आपलं नातं आहे, हे त्यांनी जाणलं. ठरवलं, थर्टीफर्स्टला नो सेलिब्रेशन! मिणमिणत्या प्रकाशात ग्लासाला ग्लास न लावता मेणबत्त्या उजळवून प्रकाशमान करायचा साताऱ्याचा आसमंत. जगभर पसरत चाललेल्या दहशतीच्या राक्षसाला सरत्या वर्षाबरोबरच द्यायचा निरोप. करायची एकमुखी मागणी ‘आर या पार’ लढाईची. आज ‘त्यांची’ उद्या ‘आपली’ वेळ येऊ शकते, याबाबत करायचं जागरण. कॉलेजा-कॉलेजात फिरून करायचं आवाहन. मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन यशस्वी करायचा आगळावेगळा कँडल मार्च!उपक्रमावर नको कुठल्याच संस्था, संघटना, पक्षाचं लेबल. नको जात, धर्म, पंथ, आर्थिक क्षमतांचे अडथळे. निकष एकच... विद्यार्थी! कुणी म्हणालं, ‘अभ्यासाकडे लक्ष द्या. सांगितलंय कुणी भलतंच!’ कुणी म्हणालं, ‘मिळणार आहे का पाठिंबा कुणाचा? कशाला उगीच!’ पण हे उमदे तरुण खचले नाहीत. एकत्र येण्यासाठी जागा शोधू लागले. दोन-तीन ठिकाणी नकारघंटा ऐकल्यावर तालीम संघाचं मैदान मिळालं. ठरलं! ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता तालीम संघाच्या मैदानात जमायचं.वैष्णवी-अंकिताच्या मित्र-मैत्रिणींनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. ग्रुप केले. ग्रुपचं नेतृत्व आणि जबाबदारीही स्वीकारली. सायन्स कॉलेज, सातारा पॉलिटेक्निक, अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, गौरीशंकर अशा वेगवेगळ््या कॉलेजमधले मित्र एकत्र आले. मयूर खराडे, शुभम जाधव, विशाल जाधव, अक्षय तुपे, श्रेयस शाह, गणेश वंजारी, सूरज चव्हाण, काजल परदेशी, रेश्मा भोसले, तुषार साठे, शुभम साळुंखे, संकल्प शिंदे आणि इतर सुमारे पन्नास जणांनी सह्यांचं निवेदन तयार करून एकत्र येण्यासाठी जागा शोधली. मार्ग ठरवला. तालीम संघापासून वरच्या रस्त्याने मोती चौक, तेथून पोवई नाक्यावर सांगता. आता आठवडाभर ही मंडळी उत्साहानं या ‘कँडल मार्च’ची तयारी करणार आहेत. पोलिसांची परवानगी काढण्यापासून सगळ्या तांत्रिक बाबींसाठी धावपळ करणार आहेत.... मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा क्षण संस्मरणीय करण्यासाठी! (प्रतिनिधी)कॉलेजा-कॉलेजात फिरणारविद्यार्थ्यांनी कोणत्याही संस्था-संघटनेचा ‘बॅनर’ न घेता पत्रक छापून घेतलंय. ‘थर्टीफर्स्ट’ला पाय लडखडू न देता कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यात केलंय. हे पत्रक घेऊन मुलं-मुली गुरुवारपासून प्रत्येक कॉलेजमध्ये फिरणार आहेत. आजअखेर विद्यार्थ्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला असून, ३१ डिसेंबरला सातारची विधायक युवाशक्ती दाखवून देऊ, असा विश्वास या मित्र-मैत्रिणींनी व्यक्त केला.