शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरणाचा बोजवारा

By admin | Updated: August 27, 2014 23:34 IST

संदीप शिंदे यांचा आरोप : कागदोपत्री रंगवली जाताहेत प्रशिक्षणे

सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या निधीद्वारे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी पंचायत समिती सशक्तीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायत सदस्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा बोजवारा उडाला आहे.संबंधित प्रशिक्षणे कागदोपत्री रंगवली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी केला असल्याने खळबळ उडाली आहे.या प्रशिक्षणाला ग्रामपंचायत सदस्य उपस्थितच राहत नसल्याने नेमके कोणाचे सशक्तीकरण सुरू हा संशोधनाचा विषय असून, हा प्रशिक्षण कार्यक्रम घाईगडबडीत कागदोपत्रीच रंगवला जात असल्याचा जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी वर्ये, ता. सातारा येथे सुरू असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता हा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी दीपक मेणकर उपस्थित होते. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संदीप शिंदे यांनी यावेळी उपस्थितांसमोर बोलताना केली आहे. (प्रतिनिधी)कागदावर १५०... प्रत्यक्ष मात्र ११०...!भोजन, चहा, नाष्टा खर्चाबाबत प्रती सदस्य १५० रुपये खर्च करण्यात येत असल्याचे यादव यांनी सांगितले. त्याबाबत संबंधित भोजन, चहा, नाष्टा पुरवठादारास विचारले असता त्याने ११० रुपयांत आम्ही सर्व देतो, असे सांगितले. मग उरणारे पैसे कोणाच्या खिशात जातात, याबाबत साशंकता निर्माण होते. जर भोजन खर्चात असा भ्रष्टाचार असेल तर इतर बाबीतही असा भ्रष्टाचार केला जात असेल; मात्र यादव यांनी उरलेले पैसे शासनाकडे परत पाठवले जातात, असे सांगितले.प्रशिक्षण कालावधीत ४० ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण द्यायचे होते. त्यासाठी यशदाकडून प्रशिक्षणाचा भाग ‘अ’ साठी ५२ हजार ८०० रुपये व भाग ‘क’साठी १७ हजार ६०० रुपये निधी देण्यात येणार आहे. मात्र, घाईगडबडीत घेतलेल्या या प्रशिक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यच उपस्थित नव्हते. काही पहिल्या सत्रात येऊन सह्या करून निघून गेल्याचे निदर्शनास आले तर काही महिला सदस्यांचे पती या प्रशिक्षणास उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले. या कार्यक्रमासाठी नियुक्त अधिकारी तसेच ग्रामसेवकही प्रशिक्षणास उपस्थित नव्हते.