शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

घना धाव रे... भिजव रान रे...!

By admin | Updated: July 10, 2017 14:19 IST

बळीराजाची आर्त हाक : पावसाअभावी माण तालुक्यातील पिके धोक्यात

आॅनलाईन लोकमतपळशी (जि. सातारा), दि. १0 : नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून चर्चेत असलेल्या माण तालुक्यातील स्थिती पावसाअभावी याहीवर्षी चिंताजनकच आहे. माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोहीसह परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जुनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्या आणि शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला पण त्यानंतर पावसाने दडी मारली. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने घना धाव रे.. भिजव रान रे.. अशी आर्त हाक आता बळीराजा देत आहे.पळशीसह परिसरात रिमझिम पावसाच्या आशेवरच अनेकांनी बाजरीची पेरणी केली. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे बाजरी उगवून आली खरी पण पावसाने ओढ दिल्याने बाजरीच्या पिकाने मान टाकली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात पाऊस न झाल्यास पिके करपून जाऊन दुबार पेरणीची संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच लागवड करता यावी यासाठी जमिनीची मशागत करून कांद्यासाठी सरी सोडून ठेवली आहे, पण पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा पीक दरात नेहमीच हुलकावणी देत असल्याने आता मका पीक घेण्यास पसंती दर्शवली आहे. कांद्याच्या तुलनेत मका पिकास उत्पादन खर्च कमी येत आहे तर वारंवार औषध फवारणी करावी लागत नसल्याने आणि मजुरांची फारशी गरज भासत नसल्याने मका पीक घेण्याकडे अनेकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे पळशीसह परिसरात यावर्षी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. मात्र, पाऊस नसल्याने उगवून आलेला मका किती दिवस तग धरणार ? असा प्रश्नही भेडसावत आहे. परिसरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पाऊस न झाल्यास केलेला खर्च वाया जाऊन दूबार पेरणीची टांगती तलवार डोक्यावर असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.

तळी, तलाव ठणठणीत

दरवर्षी बेंदूर सणावेळी जवळपासच्या तळी व तलावात थोड्याफार प्रमाणात पावसाच्या पाण्याचा साठा होतो. मात्र, यावर्षी तळी व तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. परिणामी बेंदूर सणाला गाईगुरांना तलावावर न धुता घरीच धुवावे लागले. बाजारपेठेतही शेतकऱ्यांनी फारशी खरेदी केली नाही. त्यामुळे पाऊस नसल्याचा परिणाम सणावर होताना दिसला.आठ-दहा दिवसात पाऊस न झाल्यास बाजरीचे पीक हातचे जाणार आहे. विहीरीतही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.- आनंदा कचरे, शेतकरी, माळीखोरा