शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

‘लोकशाही,’ ‘जनशक्तीवर’ काका बरसले !

By admin | Updated: November 15, 2016 23:55 IST

नागरी विकास आघाडीचा प्रचारास प्रारंभ : सत्ताधाऱ्यांनी पालिका ओरबडून खाल्ली; कमानी उभारून विकास होत नाही अशीही उडवली खिल्ली

कऱ्हाड : कऱ्हाड शहरात नगरपालिकेचे वारे वाहू लागल्यानंतर माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी पालिकेच्या राजकारणात सगळ्यात आधी कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आणि निवडणूक झाल्यानंतर पहिली प्रचारसभाही त्यांनीच घेतली. फरक फक्त एवढाच पत्रकार परिषदेला डॉ. सुरेश भोसले नव्हते आणि सभेला मात्र त्यांची उपस्थिती आवर्जून होती. सोमवारी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यसैनिकांचा परिसर म्हणून परिचित असणाऱ्या आझाद चौकात नागरी शहर विकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमात उंडाळकरांनी पुण्याचा संदर्भ देत नागरी विकास आघाडी का स्थापन केली? हेच स्पष्ट करत सत्ताधारी लोकशाही आघाडीबरोबर प्रस्थापित जनशक्ती आघाड्यांवर चांगलेच बरसले. मंगळवार पेठ आणि पाटण कॉलनीतील सत्ता केंद्रांवर त्यांनी सडकून टीका केली. ‘माझ्या हातात देण्यासाठी शहरातील निवडणुकींना जे लागतं त्यातलं काही नाही. माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी भरपूर वेळ आहे. तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, या शहराचे रूप बदलण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेन,’ असे त्यांनी यावेळी सांगितले. नागरी विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही परिवर्तनाच्या लढाईला सुरुवात करीत आहोत. मतदारांनी घाबरून जाऊ नये. मतपेटीतून क्रांती करण्याची हीच वेळ आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. सामाजिक, आर्थिक परिर्वतन घडवून आणले; पण त्यांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या मंडळींनी कऱ्हाडचे वाटोळे केले आहे. कऱ्हाडचा घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. मी आमदार असताना पंचवीस एकर जमीन यासाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र, ती हातची जमीन सत्ताधाऱ्यांनी घालवली. त्याला विरोधकांनीही हातभार लावल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. म्हणून आज बाराडबरीमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिलेले पाहायला मिळत आहे. मुजावर कॉलनीमध्ये निधी टाकणारा मी पहिला आमदार आहे. खचलेल्या, पिचलेल्या जनतेला मी शहरात आणण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल होते; पण त्यानंतरच्या निवडणुकीत तेथील जनतेने मला मते दिली नाहीत, अशी खंत बोलून दाखवायलाही ते विसरले नाहीत. धनिक लोकांच्या तालावर लोकशाही नाचता कामा नये, ही भूमिका आपण पहिल्यापासूनच घेतली आहे. पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात काढले. सलग ३५ वर्षे आमदार म्हणून काम पाहिले. मंत्री झालो; पण निवडणुका लागल्यावर अशा सहा महिन्यांत निधी टाकण्याची आणि विकासकामे करण्याची घाईगडबड कधी केली नाही आणि जात, पात, धर्म याला कधीही थारा न देता आपण काम केल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. (प्रतिनिधी) चेहरा बदलला प्रवृत्ती कुठे? लोकशाहीच्या नावाखाली शहरात हुकूमशाही करणाऱ्या एका आघाडीने पाच वर्षांत विकासाचे एकही काम मार्गी लावले नाही. तुझे ठेकेदार कोण? माझे ठेकेदार कोण?, तुझी टक्केवारी किती?, माझी टक्केवारी किती? यांनी स्वत: ची घरे भरली आणि आता बदनाम झालो म्हणून एक सोडून दुसरा चेहरा घरातीलच बाहेर काढला. चेहरा बदलला असला तरी प्रवृत्ती बदलली आहे का? याचा कऱ्हाडकरांनी शोध घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एवढ्यात नवे शहर वसले असते ! यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यावेळी म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांकडे रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाण्याचे व्यवस्थापन आदी प्रश्नांची उत्तरे नाहीत. तर दुसरी आघाडी आम्ही शंभर कोटी निधी दिला याचे तुणतुणे वाजवित आहेत; पण विकास काहीच झालेला दिसत नाही. खरेतर एवढ्या पैशात नवे शहर वसले असते,’ असा टोला लगावला. शंभर कोटी गेले कुठे ? सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावावरती शंभर कोटी हडप केल्याचा आरोप उंडाळकरांनी यावेळी केला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते शंभर कोटी विकासासाठी मी आणल्याचे सांगत असले तरी त्यावेळी विधीमंडळात मी आमदार म्हणून उपस्थित होतो. त्यामुळे हे पैसे गेले कुठे? हे विचारण्याचा मला नैतिक अधिकार आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली गळा घोटण्याचे काम केल्याचे उंडाळकर म्हणाले.