शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही नव्हे संधीसाधूंची आघाडी !

By admin | Updated: December 24, 2015 23:56 IST

विरोधी नगरसेवक आक्रमक : कऱ्हाडात रस्तेखोदकामावरून आंदोलन

कऱ्हाड : ‘शहरात गेल्या पाच वर्षांपासून एकही काम निट न करणारी सत्ताधारी पक्षाची आघाडी ही लोकशाही नसून संधीसाधू, फसवणूक करणाऱ्या नगरसेवकांची आघाडी आहे. गेल्या पाच वर्षांत बहुमताच्या जोरावर जनतेची फसवणूक करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, स्वत:चे कार्यकर्ते पोसण्याकरिता ठेकेदारांना भरघोस सवलत देणे व स्वत:चा आर्थिक फायदा करून घेणे एवढाच लोकशाही आघाडीने उद्योग केला आहे.’ अशी टीका नगरसेवक श्रीकांत मुळे यांनी केली.वायफाय योजनेसाठी शहरात खोदण्यात आलेले रस्ते त्यांची झालेली दुरवस्था व त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रास याबाबत गुरुवारी कऱ्हाड पालिकेच्या विरोधी आघाडीतील नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नगरसेवकांनी गुरुवार पेठ येथील सराफ कट्टा या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. शारदाताई जाधव, अरुणा शिंदे, श्रीकांत मुळे, बाळासाहेब यादव, विक्रम पावसकर, सुरेखा पालकर, विनायक पावसकर आदी उपस्थित होते. या कामांची चौकशी करावी, अशी मागणी करत मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांना सर्व नगरसेवकांनी निवेदन दिले. नगरसेवक मुळे म्हणाले, ‘वायफाय या सुविधेसाठी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सत्ताधारी नगरसेवक व कंपनीचे ठेकेदार यांचे हितसंबंध असल्याने स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्याकरिता जनतेला वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले आहे. वायफाय सुविधेतून लोकांना मोफत इंटरनेट वापरता येणार असल्याचे सांगत सुविधा उभारण्यात येत आहे. यातून निव्वळ जनेतची फसवणूक केली जात आहे. अद्यापही ही सुविधा का सुरू होऊ शकली नाही ? या सुविधेबाबत अजूनपर्यंत संपूर्ण माहिती का दिली जात नाही?’रस्ता चुकीच्या बाजूने खोदत आहेत, हे कामगारांच्या लक्षात आल्यानंतर तो त्याच अवस्थेत गेले २० दिवस ठेवून दुसऱ्या बाजूने नव्याने खोदकाम सुरू केले. या चुकीमुळे आर्थिक नुकसान ठेकेदारांकडून झाले आहे, असेही विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी सांगितले. (प्रतिनिधी) नगरसेवक की कंपनीचे एजंट !लोकशाही आघाडीतील नगरसेवकांच्या बेजबाबदार वृत्तीचा पुरावा म्हणजे हे आज शहरात चालत असलेले चुकीचे, बेकायदेशीरपणे काम होय. या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत कंपनीच्या ठेकेदारांच्या व्यवसायाला लावलेला याचा हातभार यावरून लोकशाही आघाडीचे नगरसेवक हे खरे तर नगरसेवक आहेत की कंपनीचे एजंट ? असा सवाल करण्यात आला.