शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

भगव्या डाळिंबांच्या रोपांना परराज्यात मागणी

By admin | Updated: April 17, 2016 23:33 IST

दशरथ भोसलेंचा प्रयोग : घाडगेवाडीत शेततळ्यावर सायफनपद्धतीने रोपवाटिका तयार

दशरथ भोसलेंचा प्रयोग : घाडगेवाडीत शेततळ्यावर सायफनपद्धतीने रोपवाटिका तयारफलटण तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी म्हणून कायमच ओळखला जातो; मात्र येथील काही शेतकरी असेही आहेत की, जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करून आदर्श शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यापैकी एकच असलेले घाडगेवाडीतील दशरथ मारुती भोसले यांनी शेततळ्यांवर सायफनपद्धतीने भगवा डाळिंबांची रोपवाटिका तयार केली आहे. या रोपांना राज्याबाहेरून मागणी वाढत आहे. घाडगेवाडी हे पूर्ण दुष्काळी गाव होते. त्यावेळी १९८० मध्ये वडिलोपार्जित तीन-चार ठिकाणची जमीन विकून मुळीकवाडी गावच्या हद्दीत मारुती भोसले यांनी दहा एकर जमीन खरेदी केली. त्याचे सपाटीकरण करून त्यामध्ये विहीर खोदली; पण पाणी कमी असल्याने त्यांनी आंबा, डाळिंब आदी फळबाग घेतली. त्यांचा मुलगा दशरथ याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर शेतीमध्ये लक्ष घातले आहे. त्यांनी डाळिंबांच्या झाडापासून कलमे तयार करून त्याची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. तीन एकर डाळिंबाची लागवड केली. बाकीच्या शेतात ऊस, सीताफळ, डाळिंब, आंबा, मका आदी पिके घेतली आहेत. २००४ मध्ये दुष्काळामुळे पाणी कमी पडू लागले. त्यामुळे टँकर खरेदी करून टँकरने पाणी घालून त्यांनी बाग जगवली.त्यानंतर दशरथ भोसले यांनी डाळिंबाची रोपे तयार करून विक्रीस ठेवले. त्यांनी खात्रीलायक रोपे तयार केल्याने रोपवाटिकेस शासनमान्यता मिळाली. त्यांची डाळिंबाच्या रोपांना महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या आंध्र आणि कर्नाटक राज्यांतून मागणी होत आहे.कृषी खात्यामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत १३० बाय १३० लांबी रुंदी व सतरा फूट उंचीचे शेततळे काढून ७० ते ८० लिटर क्षमतेचा पाणीसाठा झाला आहे. या शेततळ्यातून सायफनपद्धतीने पिकांना त्यांनी पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. बारा एकर क्षेत्र ठिबक पद्धतीने ओलिताखाली आणले आहे. त्यांनी चांगल्या प्रतीची रोपे पुरवून रोगमुक्त बागेमुळे त्यांना केंद्रीय कृषी खात्याने प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. पॉलिहाउसमध्ये दरवर्षी ८० ते ९० हजार रोपे तयार केली जातात. पाणी उसने मिळत नाहीफलटण दुष्काळी भागात पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचे मोल आम्हा दुष्काळी शेतकऱ्यांनाच ठाऊक. आहे पाणी म्हणून वारेमाप उधळपट्टी करुन चालणार नाही. पैसे उसने वेळेत मिळतात; पण पाणी मिळत नाही. म्हणून पावसाळ्याचे पाणी जपून वापरत असतो. पावसाचे पाणी साठवून ठेवतो. त्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने पाणी ठिबकमुळे पुरते. हाच प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांनीही राबवावा. शेतीला जोडधंदा म्हणून रोपवाटिका तयार करून आर्थिक प्रगती साधली आहे. असा अनुभव दशरथ भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.