सातारा : जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे कोरोना काळातील उपाय योजनावरील खर्चाचे ऑडिट जाहीर करावे, अशी मागणी शहर सुधार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अस्लम तडसरकर, प्रा. विक्रांत पवार, विजय निकम, वसंत बाबर, उमेश खंडझोडे आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संकटामुळे जिल्ह्यातील नगरपालिकांनी प्रतिबंधक उपाययोजना केल्या. त्याच्या खर्चाचे ऑडिट करण्यात यावे. सातारा शहर हद्दवाढीवर आक्षेप आहे. शहराच्या विकासाठी करंजे न्यू सातारा विकास प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. तसेच सातारा शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांना स्वातंत्र्य सैनिक, समतावादी, प्रबोधनकारकांची नावे द्यावीत, अशी आमची मागणी आहे.
फोटो दि.२२ सातारा शहर सुधार समिती...
फोटो ओळ : सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर सुधार समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)