शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कर्जासाठी शरीरसुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:23 IST

सातारा : फ्लॅट खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कºहाड तालुक्यातील एका परिचारिकेकडे शरीरसुखाची मागणी करत तिची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना साताºयात घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नारायण मारुती चौधरी (रा. दादाभाई चाळ, परेल, मुंबई) व ...

सातारा : फ्लॅट खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कºहाड तालुक्यातील एका परिचारिकेकडे शरीरसुखाची मागणी करत तिची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना साताºयात घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नारायण मारुती चौधरी (रा. दादाभाई चाळ, परेल, मुंबई) व अ‍ॅड. शिवराज चंद्रकांत पवार (रा. शनिवार पेठ, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. ३० वर्षीय परिचारिकेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना कºहाड येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यांचे नातेवाईक असलेल्या किरण मोरे यांनी अ‍ॅड. शिवराज पवार व नारायण चौधरी यांची ओळख करून दिली. पवार व चौधरी यांनी ‘आम्ही मुंबई येथील गोडबोले ट्रस्टचे पदाधिकारी असून, तुम्हाला साडेपाच टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देतो,’ असे आमिष दाखवले.कर्जासाठी १ लाख शेअर्स रक्कम व दोघांचे २६ हजार रुपये कमिशन असे एकूण १ लाख २५ हजार रुपये दोघांच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर चौधरी याने परिचारिकेस १६ लाख ७० हजार ३५० रुपयांचा चेक दिला. तो त्यांनी बँकत जमा केला असता बाऊन्स झाला. याचा जाब विचारला असता चौधरी याने कर्ज पाहिजे असेल तर अश्लील भाषेत शिवीगाळ करून शरीरसुखाची मागणी केली. तसेच शिवराज पवार याने खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर परिचारिकेस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.