शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अटकेची मागणी ही तर अकलेची दिवाळखोरी

By admin | Updated: April 26, 2017 23:37 IST

नानासाहेब भोसले : भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या हातातले बाहुले असल्याचा संदीप मोझर यांना टोला

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांना, खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे राजकीय अस्तित्व नियंत्रित करणे हा अयशस्वी कुटिल डाव त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कोणाला तरी साध्य करायचा आहे. पोलिस योग्य दृष्टीने परिस्थिती हाताळत असताना, कुणीतरी उठतो आणि उदयनराजेंना अटक करा, असे निवेदन देतो. त्यांची मागणी निव्वळ स्वार्थ्यांधामुळे आणि व्यक्ती द्वेषामुळे केली आहे. ही त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे. असा टोला माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब भोसले यांनी संदीप मोझर यांचे नाव न घेता लगावला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या प्रत्रकात नानासाहेब भोसले यांनी म्हटले आहे की, उदयनराजेंच्या अटकेसाठी प्रशासनावर दबाव आणताना मी किती मोठा आहे हे दाखवण्याचा तो निंदनीय प्रकार आहे,’ ‘आमचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल झालेला गुन्हा निश्चितच दुर्दैवी आहे. उदयनराजेंची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीही नव्हती व नाही. तथापि, गोरगरीब जनतेविषयी त्यांना असलेला नितांत आदर, झटपट निर्णय आणि लोकांची कामे झाली पाहिजेत ही प्रामाणिक भावना, यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची सतत बहरत आहे. या व्यक्तीला कुठेतरी अडवले पाहिजे या हेतूनेच मागे सुद्धा त्यांना २२ महिने कोणताही गुन्हा न करता अनाठायी त्रास सहन करावा लागला. त्यानंतर पुन्हा उभारी घेत प्रस्थापितांच्या अयोग्य बाबींवर प्रहार करत खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेकांचा विरोध-रोष पत्करून, सामान्य जनतेच्या हिताचीच भूमिका घेतली आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळेच उदयनराजेंना कसेही आवरा नाही तर आपला बोरी-बिस्तारा गुंडाळा या अनामिक भीतीने, पुन्हा एकदा खासदार उदयनराजे भोसले यांना अडकवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भ्रष्ट लोकप्रतिनिधींकडून खेळी खेळली जात आहे,’ म्हणूनच एकट्या उदयनराजेंच्या अटकेची त्यांनी केलेली मागणी, त्यांची पापी मनोवृत्ती दर्शवत आहे. नुकत्याच जिल्ह्यातील व्यक्तींनी सावकारीला कंटाळून आत्महत्या केली, त्याकामी संबंधित आरोप असणाऱ्या व्यक्तींना अटक करावी, सिंचन घोटाळ्यातील अधिकारी आणि जिल्ह्यातील भ्रष्ट लोकप्रतिनिधी यांना अटक करावी, जनतेच्या मालकीच्या, सहकारी बँका आणि सहकारी कारखाने ज्यांनी बुडवली व ठेवीदारांना लुटले त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी आदी मागण्या सुद्धा त्या-त्या वेळेस किंवा या निवेदनात केली असती तर त्यांना संविधानाचा निश्चितपणे आदर आहे, हे दिसले असते. परंतु त्यांनी केले नाही.खासदार उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच ते जिल्ह्यातील भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या हातातले बाहुले बनल्यानेच अशी व्यक्तीद्वेषांची मागणी करीत आहेत. तथापि, कितीही काही म्हटले तरी सर्वसामान्य जनता आणि गोरगरीब हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशीच आहे,’ असेही नानासाहेब भोसले यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)