शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नीरा घाटावरील कठडा हटविला!

By admin | Updated: June 23, 2017 00:58 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क लोणंद : नीरेच्या दत्त घाटाला कठड्याचे कुंपण घालण्यात आल्याने स्नानाचा सोहळा पार पाडण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी स्वत: तेथे हजर राहून कुंपण काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही तासांतच हे कुंपण हटविण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माउलींच्या पादुकांना पालखी सोहळ्यातील पहिले आणि एकमेव अभ्यंगस्नान नीरा नदीपात्रात दत्त घाट येथे घातले जाते. यासाठी बुधवारी काँक्रिटीकरण व लोखंडी कुंपण तयार केले होते. मात्र, या बंदिस्त कुंपणामुळे लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. भाविकांना अभ्यंगस्नान सोहळा अनुभवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार होते. या संदर्भातील सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत स्वत: जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी नीरेच्या दत्त घाटावर धाव घेतली. समक्ष पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी सिंघल यांनी लोखंडी कठडे तत्काळ हटवून घाट मोकळा करून घेतला. तसेच नीरा नदीपात्रातील साचलेला कचरा मशिनरीद्वारे काढण्याचे आदेश दिले. भाविकांची ही अडचण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे भाविकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले. -- नीरा नदीच्या दत्त घाटात दि. २४ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अभ्यंगस्नान होणार आहे. त्यावेळी भक्तगणांना व वारकरी भाविकांना कोणताही पाण्याचा तुटवडा जाणवणार नसून, वीर धरणातून पालखी सोहळ्यासाठी जो राखीव पाणीसाठा ठेवलेला असतो, तो नीरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. - व्ही. बी. मैत्री, शाखा अभियंता, वीर धरण