शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 घराण्यासाठी वाद थांबविण्याचा निर्णय: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:02 IST

शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू ...

शेंद्रे : ‘आजवर पक्ष व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो. मात्र, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाहीत. भांडणातून आणि संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही आणि काहीही साध्य होत नाही. शिवछत्रपतींच्या घराण्याचे वलय आपापसातील वादामुळे मलीन होऊ नये म्हणून हा संघर्ष थांबविण्याचा निर्णय आम्ही घेतला. कार्यकर्त्यांनीही एकत्रित प्रयत्न करून उदयनराजेंना प्रचंड मतांनी विजयी करूया,’ असे आवाहन आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ सोनगाव, ता. सातारा येथे आयोजित शेंद्र्रे व परळी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर उदयनराजे भोसले, सारंग पाटील, सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, अरविंद चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, कमल जाधव, वनिता पोतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘उरमोडीचे धरण झाले आता कॅनॉल झाले पाहिजे. कारण कॅनॉलमुळेच हरितक्रांती घडेल. मात्र त्यासाठी आघाडीचे सरकार अस्तित्वात यायला हवे. सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. सध्या देशातील कोणताही घटक सरकारच्या कारभारावर खूश नाही. बळीराजा अगोदरच अडचणीत आला आहे. नोटबंदीच्या प्रयोगामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकही अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र देशात हुकूमशाहीचे अवडंबर माजू द्यायचे नसेल तर सध्याचे सरकार हटवा.’हे नाणं ओरिजनल आहे.. उदयनराजे‘निम्म्याहून अधिक लढाई नियोजनावर अवलंबून असते. सर्व बूथ कमिटी सदस्य सक्रिय झाल्याने केवळ माझाच आत्मविश्वास वाढला, असे नाहीतर विधानसभेच्या आगामी निवडणुकीतून शिवेंद्रसिंहराजे पुन्हा आमदार असतील, हे सिद्ध झाले आहे. ज्यांनी जनतेची दिशाभूल केली. केसाने गळा कापला आणि जे सर्वसामान्यांवर रुबाब दाखवतात, त्यांना धडा शिकवणारे खणखणीत नाणं आम्ही आहोत. हे नाणं ओरिजनल आहे. शोले सिनेमातल्यासारखे बनावट नाही. जनता आमचाच विचार करेल, अशी आम्हास खात्री आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक