शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीमधील गटबाजीच्या धोक्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:53 IST

शेंद्रे : ‘विधानसभा निवडणुकीत गटबाजीचा धोका होईल, ही शक्यता होती. याबाबत पक्षश्रेष्ठींना वारंवार सांगूनही त्यांनी ते समजून घेतले नाही. ...

शेंद्रे : ‘विधानसभा निवडणुकीत गटबाजीचा धोका होईल, ही शक्यता होती. याबाबत पक्षश्रेष्ठींना वारंवार सांगूनही त्यांनी ते समजून घेतले नाही. त्यामुळे अखेर पक्ष सोडावा लागला,’ असे स्पष्टीकरण आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.शेंद्रे, ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भाजपवासी झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे बुधवारी रात्री जंगी स्वागत करण्यात आले. या ठिकाणी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे मत व्यक्त केले.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, कांचन साळुंखे, सौरभ शिंदे, लालासाहेब पवार, राजू भोसले, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आदींसह सातारा शहर, तालुका व जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘राष्ट्रवादी पक्षात पहिल्यापासूनच कूरघोड्या सुरू होत्या. त्या पक्षश्रेष्ठींपुढे मांडल्या होत्या. अंतर्गत गटबाजीचा धोका होईल, या शक्यतेने मी हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत सातारा-जावळीतून राष्ट्रवादीला मताधिक्य मिळवून दिले होते. तरीदेखील कूरघोड्या थांबल्या नाहीत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.’‘उरमोडी कॅनॉलचे काम प्रलंबित आहे, मेडिकल कॉलेजचा प्रश्न, सातारा तालुक्याला साडेतीन टीएमसी पाणी खेळले पाहिजे. भाऊसाहेब महाराजांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे. सातारा हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावायचा आहे, ही कामे पूर्ण करायची असतील तर सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. सातारा-जावळी मतदारसंघात विकास साधण्याच्या हेतूनेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या मेळाव्याला सातारा शहर, तालुका, जावळी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सतीश कदम, लालासाहेब पवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.