शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यात ४९० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतदिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतदिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ शेतकºयांना करण्यात आले. यानंतरआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलासशिंदे, निवासी उपजिल्हाधिकारीभारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेराजेंद्र सरकाळे आदी यावेळी उपस्थित होते.या कर्जमाफीमुळे शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘राज्यभरातून ५६ लाख ५९ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले हाते. आॅनलाईन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्य शेतकºयालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासन शेतकºयांसाठी विविध योजना राबवत आहे.या योजनांमधून शेतºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे. शासनाने कर्जमाफी देण्यासाठी ३ वर्षे अभ्यास केला व योग्य वेळी कर्जमाफी दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे विशेष कौतुक करतो.आॅनलाईन अर्ज भरलेल्या शेतकºयांची यादी पोर्टलवरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शेतकºयांना सक्षम करण्यासाठी व त्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे.या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्य शेतकºयांना झाला आहे. तसेच दुष्काळी भागातही टँकरची संख्या कमी झालेली आहे. भविष्यकाळात या कर्जमाफीचे परिणाम दिसून येणार असून, शेततकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.पालकमंत्र्यांकडून काढता पाय...!गेल्या चार महिन्यांपासून यवतेश्वर ते कास रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत आक्रमक झालेल्या पालकमंत्र्यांना यवतेश्वर-कास परिसरातील एकाही बांधकामावर कारवाई झाली नाही. कारवाई होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चक्क ‘मला कास अतिक्रमण प्रश्नावर बोलायचे नाही,’ असे म्हणत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.