शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

जखमी बिबट्याचा अखेर मृत्यू

By admin | Updated: June 20, 2014 00:30 IST

भूकबळी : आगाशिवच्या पायथ्याला अंत्यसंस्कार

मलकापूर : विंग (ता. कऱ्हाड) येथील उसाच्या शेतातून जेरबंद केलेल्या मादी बिबट्याचा आज, गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशक्तपणामुळे बिबट्या दगावल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सायंकाळी आगाशिव डोंगरालगत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विंग येथील कणसे मळा शिवारात शंकर कणसे यांच्या उसाच्या शेतात काल, बुधवारी बिबट्याची मादी आढळली होती. जयवंत कणसे व संतोष कणसे हे दोघेजण शेतात गेले असता त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल भरत पाटील, बी. के. जाधव, एस. जे. संकपाळ, बाबूराव पाटील, राजेंद्र सोनवणे, गवते, सागर कुंभार, वनकर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी काही अंतरावरूनच बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण केले. त्यावेळी तो जखमी व उपाशीपोटी असल्याचे वनाधिकाऱ्यांना जाणवले. बिबट्याची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनक्षेत्रपाल भरत पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत पिंजऱ्यात घातले. त्यानंतर त्याला कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला सुरक्षितस्थळी हलविले. बुधवारी रात्रीपासून बिबट्यावर उपचार सुरू होते. रात्री त्याला खाण्यासाठी मांस टाकले होते. मात्र, ते मांसही बिबट्याने खाल्ले नाही. तसेच उपचारालाही त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला. मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांच्यासह इतर पंचांसमक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर बोर्डे यांनी शवविच्छेदन केले. (प्रतिनिधी)