शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू गाठतोय ‘खिंडी’त !

By admin | Updated: September 26, 2015 00:40 IST

सातारा : शिवराज तिकाटणं ठरतंय धोक्याचं; आठ वर्षात ३४ जणांचा बळी

सातारा: येथील शिवराज तिकाटण्यावर अपघाताची मालिका संपता संपेनाशी झाली आहे. या ठिकाणी ओव्हर ब्रीज नसल्यामुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागला असून गेल्या आठ वर्षात या ‘खिंडी’त तब्बल ३४ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. या ठिकाणी होणारा प्रस्तावित ओव्हर ब्रीज होईपर्यंत आणखी कितीजणांचा बळी जाणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.महामार्ग प्राधिकरणाने ज्यावेळी हायवेचे काम हाती घेतले. त्यावेळी शिवराज पेट्रोलपंपाजवळ उड्डाण पूल उभारण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. सध्या महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू आहे. शिवराज तिकाटण्यावर उड्डाणपूल उभारण्याचे महामार्ग प्राधिकरणाने नियोजन केले आहे. मात्र, तोपर्यंत हा चौक कितीजणांचा बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंगळवारी रात्री सातारा शहरातील जितेंद्र बहुलेकर या दुचाकीस्वाराला त्याच ठिकाणी ट्रकने उडविले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवराज तिकाटण्यावर सातत्याने अपघात होत असल्याने गेल्या आठ वर्षांत या ठिकाणी किती जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. याची माहिती घेतली असता धक्कादायक आकडेवारी समोर आली.गेल्या आठ वर्षांत या तिकाटण्यावर तब्बल ३४ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस डायरीत नोंद आहे. इतकी भयानक परिस्थिती असताना यावर कोणीच काही बोलत नाही. त्या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वारांना नाहक जीव गमवावा लागत आहे.शिवराज तिकाटण्यावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. हे ठिकाण अपघात प्रवणक्षेत्र म्हणून ओळखत असताना महामार्ग प्राधिकरणाने कसलेही सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांची अनेकदा फसगत होत आहे. खिंडवाडीहून साताऱ्यात येत असताना उतार आहे. त्यामुळे वाहने वेगात येत असतात. याचवेळी एखादा पादचारी किंवा दुचाकीस्वार महामार्ग ओलांडत असेल तर त्याचा जीव कासावीस होतो. (प्रतिनिधी)‘त्या’ कुटुंबाला अजूनही धास्ती !दोन वर्षांपूर्वी सत्त्वशीलनगर परिसरात राहणाऱ्या माणिक शिंदे कुटुंबीयाचा एकुलता एक मुलगा याच शिवराज तिकाटण्यावर ठार झाला. त्यानंतर काही महिन्यातच त्याच ठिकाणी त्याच्या मावशीचाही असाच दुर्देवी अंत झाला. सध्या या ठिकाणाहून जाताना शिंदे कुटुंबीय नेहमी धास्तावलेले असते. घरातील दोन व्यक्तींचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याने महामार्ग ओलांडून न जाता देगाव फाट्यावरून भुयारी पुलाखालून घरी जाण्याचा शक्यतो शिंदे कुटुंबीय प्रयत्न करत असते. इतकी दहशत त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.