शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात नामांकित पैलवानाचा स्वाईन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 21:11 IST

अंगापूर : अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे स्वाईन फ्लूने नामांकित पैलवान अनंत अप्पाजी कणसे (वय ५०) यांचा पुणे येथील रुग्णालयात रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला जिल्ह्यातील हा सतरावा बळी आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून कणसे हे ताप, सर्दी, खोकल्याने बेजार झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी गावातीलच खासगी रुग्णालयात ...

अंगापूर : अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे स्वाईन फ्लूने नामांकित पैलवान अनंत अप्पाजी कणसे (वय ५०) यांचा पुणे येथील रुग्णालयात रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला जिल्ह्यातील हा सतरावा बळी आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून कणसे हे ताप, सर्दी, खोकल्याने बेजार झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी गावातीलच खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर कणसे यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. तेथे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांना श्वासोच्छवास घेताना त्रास होत होता. दरम्यान, रविवारी सकाळी अचानक उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अंगापूर परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांनी स्वाईन फ्लूची धास्ती घेतली आहे. आरोग्य विभागाने या परिसरात येऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.नामांकित मल्ल अन् व्यायामाची आवड..अनेक कुस्ती मैदाने गाजवलेले मजबूत शरीरयष्टीचे असणारे बाळू पैलवान हे अंगापूर वंदन विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन होते. त्यांचा राजकीय, सामाजिक क्रीडा क्षेत्रात नेहमी वावर असायचा. त्यांचा स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाल्याने अंगापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.