शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटात जखमी झालेल्या डिस्कळच्या जवानाचा मृत्यू

By admin | Updated: April 22, 2016 22:22 IST

खटाव तालुका सुन्न : बिकानेरमध्ये घडली होती दुर्घटना

बुध : राजस्थानातील बिकानेरमध्ये टँकच्या स्फोटात जखमी झालेले डिस्कळचे जवान तुषार तानाजी घाडगे यांचा उपचार सुरू असताना नवी दिल्ली येथे शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे डिस्कळसह खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सोळा वर्षांपूर्वी भारतीय लष्करात नाईक पदावर भरती झालेले जवान तुषार घाडगे हे राजस्थानातील बिकानेर येथे ०३ मेकॅनिकल इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत होते. दहा दिवसांपूर्वी तांत्रिक काम करीत असताना टँकचा स्फोट झाला होता. या स्फोटात काहीजण जखमी झाले होते. गंभीर जखमी अवस्थेतील तुषार घाडगे यांना तातडीने नवी दिल्ली येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ग्रामस्थ हळहळलेजवान तुषार घाडगे काही दिवसांनी सुटी घेऊन गावी येणार होते; मात्र दुर्दैवाने ते स्फोटात गंभीर जखमी झाले आणि अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी समजताच डिस्कळसह परिसरात सर्वजण हळहळले. तालुक्यात सर्वत्र शोकसंदेशांचे फलक लावण्यात आले आहेत.आज पार्थिव येणारतुषार घाडगे हे घरातील एकमेव कर्तेसवरते होते. त्यांच्या मृत्यूमुळे घाडगे कुटुंबीयांचा आधार हरवला असून, कुटुंबीयांसह डिस्कळ गाव शोकसागरात बुडाला आहे. जवान घाडगे यांचे पार्थिव शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथून विमानाने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात येणार असून, सायंकाळपर्यंत पार्थिव त्यांच्या मूळगावी डिस्कळ येथे पोहोचण्याची शक्यता आहे.