शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वीज तारेच्या स्पर्शाने दाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे तुटलेल्या तारेची पूर्वकल्पना वायरमनला देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढावला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे तुटलेल्या तारेची पूर्वकल्पना वायरमनला देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढावला. यामुळे वीज वितरण अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील वाजेगाव-निंबळक हद्दीतील मतकर मळा येथील शेतात विजेची तार खाली पडली होती. याबाबत सकाळी सहा वाजताच संबंधित वायरमनला माहिती दिली होती. मात्र, नेहमीप्रमाणे वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. जनावरांना चारा आणण्यासाठी दीपक मतकर हे पत्नी योगितासोबत सकाळी आठच्या सुमारास चालले असताना खाली पडलेल्या विजेच्या तारेचा अंदाज आला नाही. त्यांचा स्पर्श तारेला झाल्याने दोघांनाही जबर धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.त्याचवेळी दीपक यांचे चुलते वैरण घेऊन येत होते. त्यांनाही सौम्य धक्का बसला व दीपक व योगिता निपचित पडल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यावर वस्तीवरील सर्वजण पळत आले. काहींनी ट्रान्सफार्मरवरील फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला. दीपक व योगिता यांना हलवून पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.दीपक मतकर यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असून मुलगी दहावीत, तर मुलगा सातवीत शिकत आहेत. त्यांना एक एकर शेती असून, या घटनेने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.‘महावितरण’विरोधात संतापघटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी आले. तहसीलदार विजय पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.यावेळी तहसीलदार पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत घालून वीज वितरण व शासन स्तरावरून मदत देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, घटनेनंतरही महावितरणचा कोणताही अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.