शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महागाईत एकादशी..

By admin | Updated: July 9, 2014 00:02 IST

दुप्पट कसं खाशी ? फराळही खातोय भाव : एका माणसाचा उपवास तब्बल दीडशे रुपयांना

सातारा : एकादशी दुप्पट खाशी असं म्हणून समृध्द अन्नसंस्कृतीची झलक देणाऱ्या उपवासातील जिन्नस खरेदी सर्वसामान्यांना महाग पडू लागली आहे. म्हणूनच एकादशी दिवशी दुप्पट कसं खाशी, असा सवाल सातारकरांना पडला आहे. कारण एका दिवसाचा एका माणसाचा उपवासाचा खर्च तब्बल दीडशे रुपयांच्या घरात पोहोचला आहे. विठ्ठलनामाच्या जयघोषात वैष्णवांचा मेळा पंढरपुरात पोहोचला. विठ्ठलाच्या भेटीसाठी आसुसलेले वारकरी त्याच्या दर्शनाने तिथे तृप्त होतील, तर कार्यबाहुल्यांमुळे ज्यांना जाता आले नाही, असे अनेकजण घरीच उपासना करतील. ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. या म्हणीप्रमाणेच अखंड दिवस उपवासाचा फराळ करत अनेक जण दिवस व्यतीत करतात. सकाळी साबुवडा, दुपारी खिचडी, संध्याकाळी उपवासाचे थालीपीठ आणि रात्री वरीच्या तांदळाचा भात अन् शेंगदाण्याची आमटी असा फर्मास बेत आखलेला असतो. तसेच वेळ मिळेल तेव्हा वेफर्स, राजगिरा, शेंगदाण्याचा लाडू आदी जिन्नस असतातच. पूर्वीपासून एकादशी अशी साजरी करण्याची सवय लागलेल्यांना आता वाढत्या महागाईचे चटके बसू लागले आहेत. वीस रूपये किलो असलेल्या बटाट्यांनी तिशी ओलांडली आहे, तर रताळ्यांनी पन्नाशी गाठली आहे. मंडईतील हे दर ऐकून सामान्य माणूस हादरला आहे. ४उपवासाच्या दिवसांत वेगळ्या चवीचे असे तयार थालीपिठाचे पीठ मिळते. शहर व परिसरातील उत्पादक हे पीठ सुमारे २१५ रुपये किलो दराने विकतात. एकादशीनिमित्त या पिठाला चांगली मागणी असते. पण यंदा गुजरातहून आलेले पीठ अवघ्या शंभर रूपयांत एक किलो मिळते. हे पीठ उपवासकर्त्यांना आणि गृहिणींना खुणावत आहे. परस्परांच्या ओळखीने अनेकांनी या एकादशीला हे पीठ घरी नेले आहे. वाढत्या महागाईत या पिठाने आधार दिला आहे. रमजान महिन्यामुळे तेजीरमजान महिन्यामुळे फळांना मागणी आहे. यातच एकादशी आल्यामुळे खजूर आणि फळांचे दर चांगलेच वाढले आहेत. मागणी वाढल्यामुळे दरांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे फळांच्या दरातही तीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे बाजारपेठेतील चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)