शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

विशेष बालकांना ‘डे केअर’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:31 IST

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बाई उद्या शाळेत येणार नाहीत म्हटलं की ही मुलं हिरमुसतात... बार्इंनी फुकट काही द्यायचं नाही म्हटलं की घरातल्यांकडूनही पैसे घेतात... घर आणि शाळेत फारसा फरक न करता ही मुलं तशीच राहतात, या मुलांविषयी ऐकताना काहीसं आश्चर्य वाटतं ना? खरोखरंच ही मुलं आणि त्यांना शिकवणारे ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बाई उद्या शाळेत येणार नाहीत म्हटलं की ही मुलं हिरमुसतात... बार्इंनी फुकट काही द्यायचं नाही म्हटलं की घरातल्यांकडूनही पैसे घेतात... घर आणि शाळेत फारसा फरक न करता ही मुलं तशीच राहतात, या मुलांविषयी ऐकताना काहीसं आश्चर्य वाटतं ना? खरोखरंच ही मुलं आणि त्यांना शिकवणारे शिक्षक एकदम विशेष आहेत !बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या कायद्यातील तरतुदीनुसार वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत प्रत्येक विशेष गरज असणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये शालेयपूर्व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. लघुकालीन अनिवासी व निवासी असे या वर्गाचे स्वरूप आहे. सातारा जिल्हा परिषदेने या ‘डे केअर’ सेंटरला सुरुवात केली.तत्कालीन जिल्हाधिकारी रामास्वामी एन. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. पालिकेच्या शाळा क्रमांक २० मध्ये हे सेंटर पाच वर्षांपासून सुरू आहे. एक शिक्षक, एक फिजिओथेरपिस्ट यांच्या सहकार्याने वर्ग सुरू झाला. पूर्वी अवघ्या दोन विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या सेंटरमध्ये सध्या १५ मुलं आणि त्यांचे पालक असतात.बहुविकलांग, मतिमंद, सेलिब्रेल पारसी, मतिमंद असे विद्यार्थी या सेंटरमध्ये कौशल्य प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. नियमित विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचा अभ्यासक्रम वेगळा असतो. वस्तू हातात धरता येणं, वस्तू ओळखणं, स्वत:चे काम स्वत: करणं हा त्यांच्या अभ्यासाचा एक भाग आहे. या सेंटरचा नावलौकिक लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून येथे येणाºया मुलांची संख्या वाढत आहे. मात्र, मर्यादित साधनसामग्री असल्यामुळे प्रवेशावरही मर्यादा आहेत.सध्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं काम अश्विनी रानडे करतात. तर डॉ. रोहित बर्गे मुलांकडून व्यायाम करून घेतात. शाळेतील मुलांची प्रगती उत्तम असून, या केंद्रातून काही विद्यार्थी नियमित शाळेत दाखल झाले आहेत. शाळेचे काही विद्यार्थी स्वयंरोजगार करू लागले आहेत, हे विशेष !जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाºया या सेंटरमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांचेही विशेष लक्ष आहे. दानशूर व्यक्तींनी केंद्राच्या मोठ्या जबाबदाºया उचलल्या आहेत. या सेंटरमधून बाहेर पडलेले विद्यार्थी कौशल्य घेऊन आपली गुजराण करू शकतात इतकी सक्षमता त्यांच्यात निर्माण करण्याचं श्रेय केवळ इथं झटणाºया सगळ्यांचं म्हणावं लागेल.दिग्गजांनी केले कौतुकराज्यभरात असे ‘डे केअर’ सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, बहुतांश ठिकाणी हे सेंटर बंद अवस्थेत आहे. सातारा येथील सेंटरची यशोगाथा पाहण्यासाठी जागतिक बँकेचे अधिकारी असो वा युनिसेफचे पदाधिकारी त्यांनी सेंटर आणि तिथल्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. अभिप्राय वहीत या मान्यवरांचे अभिप्राय सेंटरविषयी अभिमान निर्माण करून देतात, हे नक्की !