शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

दिवसा बांधकाम अ्न रात्री घरफोडी...

By admin | Updated: November 14, 2014 23:16 IST

‘टार्गेट’ सातारा : परप्रांतीय चोरट्यांची नवीन व्यूहरचना

मोहन मस्कर-पाटील - सातारा  -‘पेन्शनर्स सिटी’ म्हणून ओळख असलेले सातारा शहर आता परप्रांतीय चोरट्यांना चांगलेच आवडू लागले आहे. दिवसभर कुठे तरी काम करायचे आणि रात्रीच्या वेळी एखादा बंगला हेरून त्यावर डल्ला मारायचा, असा दिनक्रम परप्रांतीयांचा ठरलेला आहे. गेल्या काही दिवसांत सातारा जिल्ह्यात घडलेल्या आणि उघडकीस आलेल्या घटना लक्षात घेता सातारा जिल्हा परप्रांतीय चोरट्यांच्या रडारवर असल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. सातारा शहराची देशभरातील ओळख ‘पेन्शनर्स सिटी’ म्हणून अधोरेखित झाली आहे. सातारा शहर आणि आजूबाजूंच्या परिसरात गेल्या काही वर्षांत नागरिकीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ‘क्राईम रेट’ही वाढला आहे. नागरिकीकरणाच्या प्रक्रियेत आजूबाजूंच्या उपनगरांमध्ये भाडेकरूंची संख्याही वेगाने वाढत असून, शाहूनगर, शाहूपुरी, संगमनगर, खेड, तामजाईनगर परिसरात परप्रांतीय भाडेकरू मोठ्या प्रमाणात अधिक आहे. ही मंडळी बेकरी, सेंट्रिग, खोदकाम, पानटपरी आदीत चांगलेच स्थिरावले आहेत.सातारा जिल्ह्यात ज्या काही चोऱ्या उघडकीस आल्या आहेत, अथवा येत आहेत. त्यामध्ये परप्रांतीयांचा सहभाग पन्नास टक्के अथवा त्याहून अधिक असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सांगतात. हे सत्यही मागील काही घटनांवरून समोर आलेले आहे. अमूक ठिकाणीच घर भाड्याने हवे अथवा सर्व सुविधा तत्काळ मिळायलाच पाहिजेत, असा कोणताही अट्टाहास परप्रांतीयांचा नसल्यामुळे स्थानिक घरमालक त्यांना तत्काळ घरे भाड्याने द्यायला तयार होत आहेत. नेमका याचाच फायदा घेत ते चोरी करत आहेत अथवा चोरी करून पसार होत आहेत.रिव्हाल्व्हर तस्करी अथवा खरेदीविक्री प्रकरणात ८0 टक्के सहभाग हा भारतातील बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यातील युवकांचा असल्याचे उघडकीस आले आहे. अन्य प्रकरणातही इतर परप्रांतीयांचा सहभागही आहे. रेकॉर्डवर असणारे अनेक गुन्हेगार हे परप्रांतीयच आहेत.लोकांच्याकडे सर्व साधने आली असली तरी लोक सतर्कतेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना आखत नाहीत. परप्रांतीय नेमका याचाच फायदा घेत आहेत. ज्या ठिकाणी परप्रांतीय भाड्याने राहत आहेत, ते घरमालकही व्हेरीफिकेशनच्या अनुषंगाने पोलिसांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे आता पोलीस तर सतर्क आहेच आणि त्यांच्या जोडीला आता नागरिकांनी सतर्क राहायला हवे.स्मरणपत्रालाही केराची टोपली...सातारा जिल्ह्यात एखादा परप्रांतीय बेकायदेशीर कृत्य करून पसार झाला तर पोलीस दल सतर्क होते. तो ज्या राज्यातील आहे, तेथील पोलीस ठाण्याशी सातारा पोलीस संपर्क साधतात. त्यानंतरही प्रतिसाद नाही मिळाला, तर स्मरणपत्र पाठविले जाते. मात्र, या स्मरणपत्रालाही परराज्यातील स्थानिक पोलीस केराची टोपली दाखवितात. विशेष म्हणजे, अनेकदा परप्रांतीय गुन्ह्यात सहभागी आढळतात त्यांचे खरे नाव कधीही पोलिसांना सांगत नाहीत. त्यामुळेही त्यांचा शोध घेणे पोलिसांना जिकिरीचे ठरते. - पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक, एलसीबीनजरेत भरतेय छानछोकीसातारा जिल्ह्यात उत्तरप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड येथून येणाऱ्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये राजस्थानींची संख्या कमी आहे. साताऱ्यात टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी येणारा परप्रांतीय त्याचा स्वभाव, पेहराव यामुळे तत्काळ लक्षात येतो. स्वभवाही शांत असल्यामुळे सातारकर त्यांना मदत करतात. बहुतांशी कामगार सेंट्रिंग अथवा फर्निचर व्यवसायात कुशल कामगार म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांना मिळणारी हजेरीही लक्षणीय आहे. ही मंडळी ज्यावेळी आपली मूळगावी जाते, त्यावेळी तेथे असणारे त्यांचे वागणे आजूबाजूंचे अथवा शेजारच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. परिणामी ‘आम्हीही तुमच्या बरोबर येऊ का...’ अशी विचारणा केली जाते. ही मंडळीही त्यांच्याबरोबर येते आणि येथे येऊन कामाला लागते. नंतर मात्र, हीच मंडळी आपले कारनामे दाखवायला सुरुवात करते. घरफोडीसाठी सेंट्रिंगचा अनुभव येतोय कामी...सातारा जिल्ह्यात चोरी केलेले अथवा करताना तसेच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले जे परप्रांतीय अथवा स्थानिक पकडले आहेत, त्यापैकी बहुतांशी दिवसभर सेंट्रिंग अथवा जेसीबी, ट्रॅक्टरचालक म्हणून काम करणारे आहेत. हे दिवसभर कोणत्याही कन्स्ट्रक्शन कंपनी अथवा बांधकामावर काम करायचे आणि रात्री घरफोड्या करायचे, असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. स्थानिक गुन्हे शाखेने सातारा-कोरेगाव रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे जे आरोपी पकडले ते सर्वजण सेंट्रिंग काम करणार होते.