शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कन्यादानापूर्वीच पित्याचा जीपच्या धडकेत मृत्यू !

By admin | Updated: April 10, 2016 00:10 IST

दोन्ही नियोजित वधू जखमी

वाठार स्टेशन : विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करून दुचाकीवरून ट्रीपलसीट घरी परतत असताना झालेल्या अपघातात वधूपिता जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेल्या दोन्ही नियोजित वधू जखमी झाल्या. दिलीप धोंडिराम भोईटे (वय ५९, रा. वाघोली, ता. कोरेगाव) असे मृत पित्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप भोईटे यांच्या दोन मुलींचा विवाह येत्या २९ एप्रिलला एकाच मंडपात होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. लग्नासाठी लागणारे कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी भोईटे शुक्रवारी त्यांच्या दोन्ही मुली शुभांगी आणि रेश्मा यांना घेऊन दुचाकीवरून (एमएच ११ डी ३६०५) साताऱ्याला गेले होते. खरेदी केल्यानंतर ते ट्रीपलसीट वाघोलीकडे यायला निघाले. पाटखळ माथ्यानजीक असलेल्या एका हॉटेलसमोर ते आले असता ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव जीपने (एमएच १२ पीए २२९०) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दिलीप भोईटे दूरवर फेकले गेले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून जीपचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या दोन्ही मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. भोईटे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतात काबाडकष्ट करून त्यांनी दोन मुली व दोन मुले यांचे शिक्षण पूर्ण केले. दोन्ही मुलींचे एकाच मंडपात लग्न होणार असल्याने घरातील वातावरण आनंदी होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने या कुटुंबाचा आधारच हरपला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भोईटे यांचा मृतदेह शनिवारी सकाळी सात वाजता घरी आणल्यानंतर पत्नी व मुलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ग्रामस्थ व नातेवाइकांच्या उपस्थितीत सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. (वार्ताहर) त्या दोघी मुली जखमी; वडिलांच्या मृत्यूबाबत अनभिज्ञ ! अपघातात शुभांगी आणि रेश्मा या दोघींचाही पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांना अद्याप सांगण्यात आले नाही. नातेवाईक त्यांच्या चौकशीसाठी जवळ आल्यानंतर ‘बाबा कसे आहेत?,’ अशी विचारपूस त्या दोघी करत आहेत.