शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

धाडी जोरात...तरीही मटका सुरूच !

By admin | Updated: July 15, 2016 22:37 IST

एकाच आठवड्यात १६ छापे : ‘एसपीं’च्या आदेशानंतर पोलिस हालले

सातारा : शांत आणि संयम सातारा आता जुगाऱ्यांच्या विळख्यात अडकत चालला असून, साताऱ्याच्या सांस्कृतिक दृष्टीने ही चिंतेची बाब ठरत आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यात जुगार, मटक्याचे अड्डे बिनबोभाट सुरू आहेत. मात्र नूतन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवैद्य व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी शहरात छापेमारी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी एकाच आठवड्यात १६ ठिकाणी कारवाई करून तीसजणांना अटकही केली.सातारा शहर हे पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात कसलाही दंगा होत नसल्याचे खुद्द पोलिसच मानतात; मात्र शहरात अनेक ठिकाणी अवैद्य व्यवसायाने अक्षरश: विळखा घातला असल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून दिसून येत आहे. शहराच्या प्रत्येक गल्ली आणि पेठामध्ये कुठे ना कुठे तरी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरूच आहेत. काही नागरिकांनी म्हणे एसपींना थेट याची माहिती दिली. त्यानंतर एसपींनी पोलिसांना कानपिचक्या दिल्यानंतर अचानक शहरात धाडसत्र सुरू झालं. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १६ ठिकाणी मटका व जुगार सुरू असल्याचे यानिमित्ताने समोर आले. याचा अर्थ पोलिसांना शहरात मटका सुरू असल्याचा कसलाही सुगावा नव्हता, असा होत नाही. शहरातील कोणत्या गल्लीबोळात काय घडतं, हे पोलिसांना समजत असतं. असे असताना मटका सुरू झाल्याचा पोलिसांना सुगावा कसा काय लागत नाही, याचे अनेकांना आश्चर्य वाटते.म्हणे हे सुरूच राहणार !कोणताही अधिकारी नवीन आल्यानंतर अशा प्रकारच्या कारवाया होतच असतात. त्यामुळे पोलिसांना यात फारसे काही नावीन्य वाटत नाही. कोणत्याही अधिकाऱ्याने कितीही ‘कडक’ आदेश दिले तरी अशा प्रकारचे व्यवसाय लपून-छपून का होईना सुरूच राहतात. त्याला कोणीही काही करू शकत नाही, असे पोलिस खासगीत बोलून दाखवितात.प्रसन्नांच्या काळात भाव वधारला !पोलिस अधीक्षक के.एम. एम. प्रसन्ना यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वडापपासून सर्वच अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा दरारा निर्माण झाला होता. प्रसन्नांची भीती घालून पोलिस अशा व्यावसायिकांना गळ घालत होते. ‘साहेबांना समजले तर आमची काही खैर नाही,’ असे ते अवैद्य व्यावसायिकांना सांगत असत. त्यामुळे साहेबांच्या भीतीमुळे पोलिसांचा भावही वधारत होता. ‘तेरी भी छूप मेरी भी चूप,’ अशी स्थिती प्रसन्नांच्या काळात होती.