शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंधाऱ्या रात्रीत मी माझेच मरण शोधत होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

कराड : अंधाऱ्या रात्रीत मी माझ्या नातवंडांना व सुनेला शोधत होते, पण माझे मलाच मरण दिसत होते. केवळ नशीब ...

कराड : अंधाऱ्या रात्रीत मी माझ्या नातवंडांना व सुनेला शोधत होते, पण माझे मलाच मरण दिसत होते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी वाचले अशा भावना २४ तास चिखलात अडकलेल्या सरजाबाई बाकडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.

पाटण तालुक्यातील मिरगाव येथे भूस्खलन झाल्यानंतर २४ तासांनी मातीचा ढिगाराखालून बाहेर काढलेल्या आजी सरजाबाई बाकडे या वाचलेल्या आहेत. त्यांना सध्या कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

मिरगाव येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री भूस्खलन झाले. या घटनेत सरजाबाई बाकडे यांच्या घरावरती डोंगर कोसळून मातीचे ढिगारे पडले होते. या घटनेत घटनेवेळी गावात वीजही नव्हती. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता. अशावेळी डोंगर कोसळत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांची विधवा सून सुमन लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडली, पण आजी आतच अडकल्या होत्या.

शुक्रवारी याबाबत प्रशासनाने शोधमोहीम राबविली. त्यावेळी सुमारे ४ फुट चिखलात आजीबाई अडकल्या होत्या. मदत कार्य करणाऱ्या लोकांनी त्यांना बाहेर काढले. त्यामुळे सरजाबाई आपला पुनर्जन्मच झाल्याचे मानतात.

आजही सरजाबाई या भेदरलेल्या दिसतात. फार कोणाशी बोलत नाहीत. सून व नातवंडांना भेटून आपल्या जिवात जीव आल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटल्याचे दिसले.

कोट

मी माझा मुलगा व्यंकटेश व मुलगी अनुष्का तसेच नणंद व तिचा मुलगा जीव मुठीत घेऊन अंधाऱ्या रात्री बाहेर पडलो. बाहेर मुसळधार पाऊस होता. पायात चप्पल नव्हते. अंग थरथरत होते. अशा परिस्थितीत गावातीलच मंदिरात पोहोचलो. सासू सरजाबाई यांच्या वाचण्याची आशा आम्ही सोडून दिली होती. मात्र देवानेच त्यांना वाचविले.

सुमन बाकाडे

फोटो

कोयनानगर येथील स्थलांतरित कक्षात सरजाबाई बाकाडे व त्यांची सून सुमन बाकाडे