शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचाईत’ होताच सुचले अधिकाऱ्यांना शहाणपण !

By admin | Updated: March 3, 2015 22:44 IST

तक्रारपेटी जाग्यावर : कऱ्हाड पंचायत समितीत मनमानीला चाप--लोकमतचा दणका

कऱ्हाड : एखाद्या विकास कामाबद्दल किंवा प्रशासकीय अडचणीबद्दल तक्रार करण्यासाठी येथील पंचायत समितीत ‘तक्रारपेटी’ होती. मात्र, अचानकपणे ती पेटी गायब झाली. ज्यावेळी हा प्रकार उघडकीस आला त्यावेळी अधिकाऱ्यांनी ‘कानावर हात’ ठेवले. आम्हाला माहितच नाही, असा पवित्रा घेत अधिकाऱ्यांनी स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘लोकमत’ने अधिकाऱ्यांच्या साळसुदपणाचा पर्दाफाश करीत गायब झालेल्या तक्रारपेटीचा पाठपुरावा केला असता अधिकाऱ्यांची चांगलीच ‘पंचाईत’ झाली. उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलं. भंगारात घातलेली तक्रारपेटी पुन्हा मुळ जाग्यावर आली. येथील पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांची मनमानी तशी नविन नाही. अधिकाऱ्यांच्या ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीचे सामान्यांना वारंवार दर्शनही घडते; पण याबाबत तक्रार करायची कुणाकडे, हाही प्रश्न आहे. त्यामुळेच सामान्यांना अक्षरश: तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन करावा लागतो. अधिकाऱ्यांच्या या मनमानीबाबत किंवा एखाद्या विकास कामांतील त्रुटीबाबत गोपनीयरीत्या तक्रार करण्यासाठी पंचायत समितीत तक्रारपेटी असायची. कुलूपबंद असलेल्या या तक्रारपेटीत सामान्यांना त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात टाकता येत होत्या. तक्रारपेटीद्वारे दिलेली तक्रार पुढे वरीष्ठ अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचायची; पण हे अवघड जागचं दुखणं कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनीच नामी शक्कल लढवली. सुमारे दोन महिन्यांपुर्वी अचानकपणे ती तक्रारपेटी पंचायत समितीमधून गायब करण्यात आली. सुरूवातीला हा प्रकार कोणाच्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे अधिकारीही हे गुपित झाकल्या मुठीत असल्याच्या अविर्भावात वावरत होते. अखेर हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ‘तक्रारी संपल्या की पेटी हरवली ?’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यावेळी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही खडबडून जागे झाले. तक्रारपेटीबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा होऊ लागली. मात्र, तरीही अधिकारी ‘ताकास तूर’ लागू देत नव्हते. कुलूप गंजल्याने पेटी काढली असल्याचे गुळमुळीत उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी कातडी वाचविण्यास सुरूवात केली. ‘म्हणे, आम्हीच काढली तक्रार पेटी’ या मथळ्याखाली पुन्हा वृत्त प्रसिद्ध करून लोकमतने अधिकाऱ्यांच्या साळसुदपणाचा बुरखा फाडला. ‘लोकमत’ने ‘तक्रारपेटी निवांत बसवा, सदस्यांचा तक्रारी तरी मिटवा’ या मथळ्याखाली या प्रकारावर सडेतोड भाष्य केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. (प्रतिनिधी)तक्रारपेटी भंगाराच्या खोलीतपंचायत समितीमधून काढून ठेवलेली जुनी तक्रारपेटी एका जबाबदार विभागाने भंगाराच्या खोलीत टाकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहामध्ये असलेल्या भंगाराच्या खोलीत ती तक्रारपेटी टाकण्यात आली होती. त्याठिकाणी खासगीत त्या पेटीवर ‘उपचार’ केले जात होते म्हणे; पण आता नव्या रंगात अन् नव्या कु लूपासह ही तक्रारपेटी पंचायत समितीत आली आहे.