शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

भीषण आगीत गादी कारखाना खाक

By admin | Updated: August 15, 2014 00:24 IST

वारुंजी फाट्यानजीक दुर्घटना : लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

मलकापूर : वारुंजी, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गादी कारखाना जळून खाक झाला. या दुर्घटनेत तयार गाद्यांसह, कापूस, कापड व इतर कच्चा माल, दुचाकी, मशिनरी आदी जळून लाखोंचे नुकसान झाले. कऱ्हाडपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वारुंजी फाट्यानजीक गाद्यांचे कारखाने आहेत. यापैकी दस्तगीर बाळू नदाफ व अन्सार दस्तगीर नदाफ या दोघांच्या भागीदारीत असलेल्या कारखान्याला गुरुवारी दुपारी आग लागली. संबंधित कारखान्यांमध्ये गाद्या तयार करण्याचे काम केले जात होते. तसेच जुन्या गाद्यांचा कापूस पिंजण्याचेही काम कारखान्यात केले जायचे. कापडाच्या चिंध्यांपासून कापूस तयार केला जात असल्याने कारखान्यात जुन्या कापड्यांचे मोठ-मोठे ढीग तयार करण्यात आले होते. कापसाच्याही त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गाठी ठेवण्यात आल्या होत्या. कारखान्यात वीस ते पंचवीस कामगार काम करीत असून, दुपारच्या सुमारास कामगारांनी जेवणासाठी सुटी केली. संबंधित कामगार कारखान्यापासून काही अंतरावरच असलेल्या वसाहतीत राहण्यास असल्याने दुपारी ते आपापल्या घरी निघून गेले. दरम्यान, दोन वाजण्याच्या सुमारास महेश जाधव व विठ्ठल जाधव (दोघेही रा. कालेटेक) हे दोघेजण दुचाकीवरून पाटणकडे निघाले असताना गादी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस आग लागली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आपली दुचाकी थांबवून आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली.घटनेची माहिती त्वरित अग्निशामक पथकाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पालिकेचे अग्निशामक पथक त्याठिकाणी दाखल झाले. पथकातील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अग्निशामकचे आणखी तीन पथके त्याठिकाणी बोलविण्यात आली. अग्निशामकच्या चार गाड्यांतून पाणी मारण्यात आल्यानंतर पाच-सहा तासांनी आग आटोक्यात आली. आग विझल्यानंतर गादी कारखान्याच्या मालकांसह कुटुंबीयांनी कारखान्यात धाव घेतली. मात्र, कारखान्यातील सर्व साहित्य खाक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी दाखल झाले. उपअधीक्षक घट्टे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती. (प्रतिनिधी)डोळ्यादेखत आपला कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे पाहताच नदाफ कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. कुटुंबातील काही महिला घरासमोर भरून ठेवलेल्या पाण्याच्या कळशा नेऊन आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होत्या. मुलेही बॅरलमधील पाणी लहान भांड्यांनी नेऊन आगीवर टाकत होती. हे दृष्य हृदय हेलावून टाकणारे होते.शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशयकारखान्यानजीक वीज खांब असून, या खांबावरून परिसरातील घरांमध्ये कनेक्शन देण्यात आले आहे. कनेक्शनच्या वायरचे खांबावर जाळे तयार झाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास खांबावर शॉर्टसर्किटने जाळ होऊन ठिणग्या उडाल्याचे व त्यामुळेच कारखान्याला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बावीस गॅस सिलिंडर रस्त्यावरज्याठिकाणी आगीची ही दुर्घटना घडली त्या परिसरात दाट लोकवस्ती आहे. भीषण आग नजीकच्या घरांपर्यंत पसरण्याची भीती होती. अशातच मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महेश जाधव, विठ्ठल जाधव यांच्यासह स्थानिक युवकांनी तातडीने परिसरातील बावीस घरांतील गॅस सिलिंडर रस्त्यावर सुरक्षित ठिकाणी ठेवले.