शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

वाझोलीवर दरड कोसळण्याचा धोका, ग्रामस्थ भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 18:36 IST

Flood Satara : वाझोली ता.पाटण येथे जोरदार पावसाने डोंगराला मोठ्या प्रमाणावर भगदाड पडण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या ठिकाणची पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्दे वाझोलीवर दरड कोसळण्याचा धोका, ग्रामस्थ भयभीतप्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी

सणबूर : वाझोली ता.पाटण येथे जोरदार पावसाने डोंगराला मोठ्या प्रमाणावर भगदाड पडण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या ठिकाणची पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.काळगाव विभागात वाझोली गाव व त्यामध्ये असणाऱ्या सलतेवाडी व डाकेवाडी या वाड्या डोंगरांनी व्यापलेल्या आहेत. या विभागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील ग्रामस्थांना नैसर्गिक आपत्तीचा दरवर्षी सामना करावा लागतो. गत आठ दिवसापासून होणाऱ्यां अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतामध्ये पाण्याचे उफाळे निघाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वाझोली गावाअंतर्गत असणाऱ्या डाकेवाडी व सलतेवाडी या दोन्ही वाड्यांमधील व गावातील ग्रामस्थ दरड कोसळण्याच्या भीतीने ग्रामसले आहेत. चार दिवसापूर्वी झालेल्या पावसाने गावातील नळ पुरवठा करणाऱ्या पाईपलाइन तसेच नदीलगत असणाऱ्या गावविहीरीचे नुकसान झाले आहे.सरपंच शितल लोहार, उपसरपंच सविता मोरे, अशोक मोरे, रामचंद्र चव्हाण, विजया पाटील, सुशीला मोरे, पोलीस पाटील विजय सुतार यांनी गावातील नुकसानीची पाहणी केली. तसेच दरडींबाबत प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली.

 

वाझोली गावामध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाले असून भात, भुईमूग शेतीचे नुकसान झाले आहे. गावातील घरांवर केव्हाही दरड कोसळेल, अशी भिती आहे. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी- किसन मोरे, शेतकरी

टॅग्स :floodपूरSatara areaसातारा परिसर