शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंविरोधात पोलिसांच्या हाती दंडुका

By admin | Updated: December 30, 2014 23:23 IST

खटामध्ये कारवाई मोहीम: विद्यार्थी, पालकांमधून समाधान व्यक्त

खटाव : येथील महाविद्यालय परिसरात अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा वावर वाढला असून याचा शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी रोडरोमिओंना चपराक बसविण्यासाठी पोलिसांनी खटावमध्ये कारवाई मोहीम सुरु केली असून याबद्दल विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.खटावमध्ये रोडरामीओंपासून होणारा त्रास तसेच त्यांच्या अश्लिील हरकती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शाळा तसेच महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत चौकात तसेच बसस्थानक आवारात रोडरोमिओंची टोळी उभी असते. विनाकारण दुचाकीवरुन घिरट्या मारणे, धुम स्टाईलने वेगात गाडी चालविणे अशा अनेक घटना रोडरामीओंकडून होताना दिसतात.या बाबिंना आळा घालण्यासाठी यापूर्वी शाळा व्यवस्थापन समीती, ग्रामपंचायत व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या सहकार्याने ठोस पावले उचलण्यात आली होती. त्यामुळे काहीदिवस शालेय विद्यार्थी निर्धास्त होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा या प्रवृत्तीत वाढ होऊ लागल्यामुळे पुसेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने रोडरोमीओंना चाप बसवण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असुन पोलीस अचानक पणे शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत येउन अशा रोडरोमीओंची धरपकड करुन प्रसंगी प्रसादही दिला जात आहे. या कारवाईची रोडरोमिओंनी धास्ती घेतल्याने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)विद्यार्थ्यांना कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन त्याची पोलिसांना माहिती द्यावी. अशा रोडरामीआेंना कठोर शासन केले जाईल. या मोहीमेमुळे रोडरोमिओंची दहशत कमी होईल.- राजेंद्र सावंत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाविद्यालयाच्या आवारात अनोळखी विद्यार्थी आढळल्यास त्याची चौकशी करुन त्याला समज दिली जाते. तसेचर महिला प्राध्यापकांकडे मुलींनी होणाऱ्या त्रासा विषयी माहिती दिल्यास त्यावर वेळीच कठोर कारवाई ही महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येते.- संजय पाटीलप्राचार्य, शहाजीराजे महाविद्यालय