सातारा : ‘पीसीए डान्स शॉप अँड शो’ या सिद्धेश पै सोबतच्या वर्कशॉपच्या पार्श्वभूमीवर पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीचे विद्यार्थी आणि नृत्यप्रशिक्षकांनी शुक्रवारी सातारा शहरातून रॅली काढली. यात सांताक्लॉज, छोटा भीम आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीस कमानी हौदापासून सुरुवात झाली. राजपथावरून मोती चौक ते खालचा रस्ता (मुख्यालय रोड) मार्गे पोवई नाक्यावर, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. २ जानेवारीपासून दहा दिवस डीआयडी फेम सिद्धेश पै सातारकरांना नृत्याचे धडे देणार आहेत. इतरांसाठी वर्कशॉपची फी २५०० रूपये असून ‘लोकमत सखी मंच, बालविकास मंच, युवा नेक्स्ट’च्या सभासदांकरिता ५०० रुपये सवलत दिली जाणार आहे. सिद्धेशसोबत लाईव्ह स्टेज शोमध्ये डान्स करण्याची संधी वर्कशॉपमध्ये सहभागी होणाऱ्या सातारकरांना मिळणार आहे. वयाचे कोणतेही बंधन नसून महिला व मुलांसाठी स्वतंत्र बॅचेसमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी होण्यासाठी पंकज चव्हाण, डान्स अॅकॅडमी कमानी हौदाजवळ, सातारा येथे तसेच ९७६४४०६४६४ व ९९२२२४९९१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हॉटेल राधिका पॅलेस, अॅम्बिशन क्लासेस, भाग्योदय ड्रेपरी, चकोर बेकरी आणि बँक आॅफ महाराष्ट्र यांनी सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)या रॅलीमध्ये पंकज चव्हाण, निशांत रणदिवे, स्वप्नील पवार यांच्यासह पालक, छोटा भीम आणि सांताक्लॉजची वेशभूषा परिधान केलेले मुले सहभागी झाली होती. ही मुले सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. सातारकरांनीही त्यांचे स्वागत केले.
‘डान्स शॉप अँड शो’ची रॅली उत्साहात
By admin | Updated: December 26, 2014 23:27 IST