शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाच्या गुढीला नसे श्रीमंतीचा बांध

By admin | Updated: March 22, 2015 00:15 IST

जिल्ह्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा : रिक्षांवरही उभारल्या गुढ्या; झोपड्यांमध्ये झाले पूजन

सातारा : जिल्ह्यात घरोघरी गुढ्या उभारून नवीन मराठी वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. ऊसतोड मजुरांनी आपल्या झोपड्यांमध्ये गुढी उभारून आनंदाच्या या गुढीला श्रीमंतीचा बांध आडवा येत नसल्याचे दाखवून दिले तर रिक्षाचालकांनीही आपल्या रिक्षावर गुढी उभारून शहरभर अभिमानाने मिरविली. गुढीपाडव्यानिमित्त महिलांनी सकाळी घरासमोर गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर कडुलिंब, गुळाचे मिश्रण सर्वांना वाटण्यात आले. मनातील कटुता दूर करून एकमेकांप्रती गोडवा निर्माण करणारा हा सण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ सजली होती. विविध प्रकारच्या रेडिमेड गुढ्या बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या होत्या. रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षावरही गुढी उभारून शहरभर मोठ्या अभिमानाने मिरविली. तर दुकानदारांनीही रेडिमेड गुढी आणून आपल्या दुकानातील टेबलावर ठेवून तिचे पूजन केले. रात्रीपासूनच गुढीसाठी बांबू मिळविण्याची धडपड सुरू होती. सातारा शहरात काही ठिकाणी बांबू विकत मिळत असल्यामुळे बांबू खरेदीसाठी लगबग सुरू होती. शनिवारी सकाळी महिलांनी बांबूला नवीन साडी लावून त्यावर पितळेचे भांडे ठवून साखरगाठीच्या माळा अडकविल्या. त्यानंतर सातारा शहरात पुरुष मंडळींनी घरासमोर गुढी उभारून पूजन करण्यात आले. (प्रतिनिधी)