शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्त कार्यकर्त्याची आत्महत्या

By admin | Updated: October 7, 2014 23:50 IST

उमरकांचन येथील घटना : कारवाईच्या भीतीने गळफास घेतल्याचा आरोप

ढेबेवाडी : उमरकांचन, ता. पाटण येथील काशिनाथ हरिबा मोहिते (वय ४५) या धरणग्रस्त कृती समितीच्या कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या भीतीने काशिनाथ यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचा आरोप करीत नातेवाईक, संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. परिणामी, रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उमरकांचन येथील काशिनाथ मोहिते यांचा धरणग्रस्त कृती समितीमध्ये सक्रिय सहभाग होता. कृती समितीने वेळोवेळी केलेल्या आंदोलनांमध्ये ते सहभागी होत होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी कृती समितीच्या इतर कार्यकर्त्यांसह काशिनाथ यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे समन्स बजावण्यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी उमरकांचनमध्ये गेले होते. त्यांनी ज्या-ज्या कार्यकर्त्यांच्या नावे समन्स होती, त्यांना गाठले. त्यावेळी संबंधित कार्यकर्त्यानी ‘समन्स तोडून उद्या पावती देतो,’ असे पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, त्यानंतर मंगळवारी पहाटेही काही पोलीस उमरकांचनमध्ये गेले होते. अशातच मंगळवारी सकाळी गावापासून शंभर मीटर अंतरावर सागवणाच्या झाडाला काशिनाथ यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. (पान १० वर)पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा‘नर्मदा बचाव’ आंदोलनच्या नेत्या सुनीती सु. र. यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी सुनीती सु. र. म्हणाल्या, ‘शासन, प्रशासन व पोलिसांनी केलेली ही हत्या आहे. त्यामुळे धरणग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व उमरकांचनमध्ये आलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे.’