अतिवृष्टीतील बाधित पीक क्षेत्र माहिती
तालुका नुकसान क्षेत्र (हेक्टर) बाधित शेतकरी
सातारा ४२७ २३७२
महाबळेश्वर १५८६ ६२४१
वाई ५०५ ३३६९
जावळी २७७ ३००४
कऱ्हाड २३९१ १४३०९
पाटण ३६३७ १९७५६
.................................................................................
शेतजमिनींचे ७४५ गावांत नुकसान...
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत पश्चिम भागातील ७४५ गावांतील शेतजमिनींचे ४१२९ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झालेले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील ३२५ गावे आहेत. तर जावळी तालुका १४७, महाबळेश्वर १०९, वाई ७७, कऱ्हाड ४७ आणि वाई तालुक्यातील ४० गावांचा समावेश आहे. तर सातारा तालुक्यासाठी ८ लाख ८१ हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे. तर कऱ्हाडसाठी ५२ लाख ४९ हजार, पाटण तालुका ४ कोटी ४६ लाख ८२ हजार, महाबळेश्वर ५ कोटी ७९ लाख ८० हजार, जावळी ९२ लाख ७३ हजार आणि वाई तालुक्यासाठी १ कोटी १७ लाख ९५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
........................................................................................