शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

फलटणला आता फ्लेक्सनंतर डॉल्बी बंदी !

By admin | Updated: August 28, 2016 23:59 IST

गणेशोत्सव बैठक : पोलिस अधीक्षकांकडून कौतुक; मंडळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

फलटण : ‘फलटण शहरात सर्वप्रथम फ्लेक्स बंदीचा कायदा आणण्यात आला. आता डॉल्बी बंदीचाही चांगला निर्णय घेऊन जिल्ह्यात फलटण आदर्श रोल मॉडेल बनविण्यासाठी आणि इतरांनी त्याचे अनुकरण करण्यासाठी सर्वच गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनात आयोजित गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती वैशाली गावडे, नगराध्यक्षा सारिका जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, अजित दोशी, हिरालाल गांधी, डॉ. विक्रम पोटे, संपतराव कळंबे, शांताराम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. फलटण जिल्ह्यासाठी रोल मॉडेल आहे. याठिकाणी राबविण्यात येणारी नियमावली ही बाराव्या शतकापासूनच्या परंपरेस अनुरूप आहे. फलटणचे अनुकरण जिल्हा करतो आम्ही, फलटणचे फ्लेक्स बंदीचे उदाहरण जिल्ह्यात देतो. तसेच उदाहरण डॉल्बीसंदर्भात ही देण्यासाठी सर्व मंडळांनी डॉल्बी बंदी करावी. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे संदीप पाटील यांनी सांगितले ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आयोजन करावे. कारण डॉल्बीचे दुष्परिणामच जास्त होतात. त्यामुळे तालुक्याचा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची भीती आहे. क्षणिक करमणुकीसाठी या गोष्टी करायच्या का? याचा विचार करण्याची गरज आहे. तरुणांनी डॉल्बीचा नाद सोडावा, पारंपरिक वाद्यामध्ये आपली संस्कृती आहे ती जपावी,’ असे आवाहन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (गजानन चौक फलटण), श्रीमंत सत्यजितराजे नाईक-निंबाळकर गणेश मंडळ (रामराजेनगर फलटण) आणि शिवछत्रपती युवक व क्रीडा मंडळ (कोळकी) या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रकाश धस, पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक मुंढे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)