शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

डागडूजी नसल्याने हातपंपाना चढला गंज!

By admin | Updated: March 28, 2017 16:32 IST

पाणीकपात झाल्यास परिस्थिती बिकट : १२८ पैकी २४ कुपनलिकांची दुरवस्था; पिण्यासाठी वापरलं जातं पाणी; पण तहान भागणार कशी?

आॅनलाईन लोकमतकऱ्हाड : शहरातील लोकांना शुद्ध व नियमितपणे पाणी मिळावे यासाठी कऱ्हाड पालिकेने शहरात सुमारे वीस वषार्पूर्वी १२८ कुपनलिका बसविल्या. या कुपनलिकांची मात्र आज मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पालिकेच्यावतीने डागडुजी करण्याअभावी या कुपनलिकांना गंज चढला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी कपात झाल्यास या कुपनलिकाच शहरवासियांची तहान भागवत असतात. कऱ्हाड शहरासह वाढीव त्रिशंकू भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून कऱ्हाड नगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी कूपनलिका बसविल्या. भूगभार्तून पाईपच्या माध्यमातून हाताच्या दाबाने पाणी वर काढता यावे अशा पद्धतीने कुपनलिकांची रचना करण्यात आली. त्याचा वापर आजही खेडोपाडी नियमित केला जातो. मात्र, शहरातील कुपनलिकांना सध्या गंज चढला आहे. पालिकेकडून नियमितपणे देखभाल व दुरूस्ती केली न गेल्याने पाणी असुनही ती पिण्यायोग्य राहिलेले नाही.शहरातील नागरिकांसाठी एकीकडे पालिकेने चोवीस तास पाणी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. तशी योजनाही शहरात युद्धपातळीवर पूर्णवत केली जात आहे. वाढता उन्हाळा पाहता तसेच त्याजोडीला भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भिती पाहता पाणी बचत करणे व ते जपून वापरणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांना दुषित पाण्याच्या समस्येला अनेकदा सामोरे जावे लागत आहे. मात्र, कुपनलीका चोवीस तास शुद्ध पाणी देत असतानाही त्याकडे पालिका डागडुजीसाठी लक्ष देत नाही ही गंभीर बाब आहे. कऱ्हाड शहरात अस्तित्वात असणाऱ्या १२८ कुपनलिकांपैकी चोवीस कुपनलिकांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामध्ये शाहू चौक येथे पाण्याची बोरींग आहे. त्यातील पाणीही शुद्धही आहे. मात्र त्याची पाईप तुटलेली आहे. रणजीत टॉवर परिसरात दोन कुपनलिका बोरींगमध्ये बदलण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासुद्धा बंद पडल्या आहेत. पाटण कॉलनीत पूर्वी कुपनलिका होती. मात्र, वाहनधारकांकडून वाहन धुण्यासाठी येथील पाण्याचा वापर केला जाऊ लागल्याने पालिकेने ती कुपनलिकाच काढून टाकली. सध्या गरज असतानाही येथे कुपनलिका बसविण्यात आलेली नाही.पांढरीच्या मारूती मंदिरासमोरील कुपनलिकेचे बोरींग केले आहे. नूतन मराठी शाळा शिवाजी क्रीडा संकुलाच्या शेजारील कुपनलिका गंजल्या असून मोडकळीस आल्या आहेत. मंगळवार पेठेतही अनेक कुपनलिकेत पाणी असून त्या मोडकळीस आल्या आहेत.नगरपालिकेच्या नवीन भाजी मंडईसाठी शेजारील असलेल्या कुपनलिकेचा वापर केला जात आहे. तर श्री चेंबर्स येथील कुपनलिक बंदस्थितीत आहे. प्रभात चित्रपटगृह परिसर, मंडई परिसरासह एस. टी. स्टँड परिसरात असलेल्या कुपनलिकांभोवती अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. योजना बंद; पण कुपनलिका चालू कऱ्हाडकरांसाठी पालिकेने चोवीस तास पाणी योजना उभारण्याचे काम सुरू केले. योजनेचे दोन -तीन वर्षांपासून काम सुरू होते. मात्र, ती मध्यंतरी कालावधीत बंद पडली होती. याऊलट दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काही कुपनलिका अजुनही चालू आहेत. पालिकेने या कुपनलिकांची दुरूस्ती व देखभाल करणे गरजेचे आहे. कुपनलिकांतून नागरीकांना पाणी मिळत असून त्याची जपणूक करणेही तितकेच गरजेचे आहे. कुपनलिकांना कचऱ्याचा वेढा१) शनिवार पेठेतील चर्चजवळील कुपनलिका व टाऊन हॉल पाठिमागील कुपनलिकांची दुरावस्था झाली आहे. २) जनता बँकेसमोरील बुधवार पेठेतील कुपनलिका गंजल्या आहेत. थोरवडे गल्लीतील कुपनलिकेमधून चांगले पाणी मिळत असल्याचे येथील नागरिक सांगतात. ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील जुन्या पोस्ट आॅफीससमोरील कुपनलिका कचरा कुंडीत सापडली आहे.४) ) शनिवार पेठेतील गणपती मंदिर पाठिमागे व हिंदकेसरी पैलवान दिवंगत शामराव मुळीक चौकातील कुपनलिका तेथील परिसरातील रहिवाशांना मोठा आधार वाटतात. ज्यावेळी पालिकेकडून पाणी पुरवठा बंद होतो तेव्हा याच कुपनलिकांमधून रहिवाशांना पिण्यासाठी पाणी मिळते.५) आंबेडकर क्रिडांगण परिसरातील कुपनलिका तर कचऱ्यानेच वेढली आहे. बंद स्वरूपात असलेल्या या कुपनलिके शेजारीच कचरा डेपो आहे. ६) महिला महाविद्यलयासमोरील कुपनलिकाही दुरावस्थेत आहे. पाणी पुरवठ्यासाठी सात टाक्याकऱ्हाडात पाणी पुरवठ्यासाठी पालिकेच्या सात टाक्या आहेत. त्यापैकी मार्केट यार्डमधील टाकीची पाणी साठवण क्षमता २० लाख लिटर, टाऊन हॉलनजीकच्या टाकीची १५ लाख लिटर, रविवार पेठेतील टाकीची १५ लाख लिटर, सोमवार पेठेतील टाकीची ७ लाख लिटर, रूक्मिणीनगरमधील टाकीची २० लाख लिटर, सुर्यवंशी मळ्यातील टाकीची १५ लाख लिटर व गजानन हौसींग सोसायटीमधील टाकीची पाणी साठवण क्षमता ६ लाख ५० हजार लिटर आहे. हातपंपावरूनही पाणी पुरवठाविद्यानगर भागासाठी बुस्टींग पंपींग स्टेशनद्वारे ७ लाख लिटर पाणी पुरविण्यात येते. शहरात कुपनलिकांची संख्या १२८ आहे. तर शहर ग्रामिण भागात ५१ कुपनलिका आहेत. त्यापैकी पंताचा कोट, मंगळवार पेठ, पांढरीचा मारूती, शिवाजीनगर, उपजिल्हा रूग्णालय, शनिवार पेठेतील शेलारांच्या घराजवळ, मोहिते हॉस्पिटलजवळ व रणजीत टॉवरसमोरच्या हातपंपावर पालिकेने वीजपंप बसविले आहेत. कऱ्हाडची पाणी वितरण व्यवस्थाकऱ्हाडची लोकसंख्या : ७४ हजार ३५५नळ कनेक्शनची संख्या : ११ हजार १०४वितरण नलिकांची लांबी : ५४ किलोमीटरपाणी आरक्षण परवाना : ६.५७ द. ल. घन लिटरदररोजचा पाणीपुरवठा : १४.०६ दशलक्ष लिटरदरडोई दरदिवशी पुरवठा : १४९ लिटर