शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘कृष्णा’काठची ‘दादा’गिरी; कोण कुणाला पडणार भारी!

By admin | Updated: June 17, 2015 00:37 IST

उलटसुलट चर्चांना उत : पॅनेलच्या विजयासाठी नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  --यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णाकाठावर राजकीय दादागिरी पहायला मिळतेय; पण यातील कोण कोणाला भारी पडणार याचीच चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.‘कृष्णा’ कारखाना म्हटलं की, यशवंतराव मोहिते (भाऊ), जयवंतराव भोसले (आप्पा) यांचं नाव पुढं येतं, राम - लक्ष्मणाची जोडी म्हणून या दोघा भावांना ओळखलं जायचं; पणं सन १९८७ च्या दरम्यान या जोडीला दृष्ट लागली अन पुढे काय रामायण घडलं, ते साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे.सन १९८३ च्या कारखाना निवडणूकीत भाऊं चे रयत पॅनेल अन् आप्पांचे सहकार पॅनेल समोरासमोर उभी ठाकली, कारखान्यात पहिले सत्तांतर झाले अन् भाऊंचे पुतणे मदनराव मोहिते ‘दादा’ झाले. कारखान्याचे अध्यक्ष बनले. १० वर्षे त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यावेळपासून कारखान्याच्याच काय पण तालुक्याच्या राजकारणात दादांचा दबदबा पहायला मिळतो. तो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीतही पहायला मिळाला.कारखान्याच्या गत निवडणूकीत मोहिते - भोसलेंचे मनोमिलन होते. एक ‘दादा’ अन् तीन ‘बाबा’ एकत्र असूनही ‘रयत - सहकार’ पॅनेलचा पराभव झाला. संस्थापक पॅनेलने विजयाचा ‘नारळ’ फोडला. अन् अविनाश मोहितेंच्या रूपाने आणखी एका ‘दादा’ नेतृत्वाचा उदय झाला. सध्या या दोन्ही दादांच्या नेतृत्वाखाली कारखाना निवडणूकीत पॅनेल उभी आहेत.‘कृ ष्णे’च्या निवडणूकीत वडगाव हवेली गावाची भूमिका नेहमीच महत्वाची मानली जाते. दिवंगत माजी मंत्री दादासाहेब जगताप यांचे गाव म्हणून या गावची ओळख आहे. सध्या त्यांचे राजकीय वारसदार म्हणून जगदीश जगताप (दादा) म्हणून ओळखले जातात. वडगावसह परिसरात त्यांचा राजकीय दबदबा आहे. ‘कृष्णे’ च्या निवडणूकीत ते यंदा भोसलेंच्या सहकार पॅनेलमधून उभे आहे. त्यांच्या जोडीला दुशेरेचे धोंडिराम जाधव (दादा) ही रिंगणात आहेत. जाधव हे पंचायत समितीतील विरोधी पक्षनेते म्हणून कार्यकरत आहेत. या दोन दादांचाही संपर्क मोठा आहे.एकंदरीत काय मदनराव मोहितेंनी रयत पॅनेलसाठी, अविनाश मोहितेंनी संस्थापक पॅनेलसाठी तर जगदीश जगताप, धोंडिराम जाधव यांनी सहकार पॅनेलच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. पण या राजकीय दादागिरीत कोण कुणाला भारी पडणार याची उलट - सुलट चर्चा सुरू आहे.