शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

तर साताऱ्यात घडतील साहसी ‘सायकल रायडर’

By admin | Updated: August 13, 2014 23:33 IST

उद्या ‘सायकल क्रांती’ : सातारची भौगोलिक रचना ‘सायकल रपेट’साठी फायद्याची

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या सातारा शहराची भौगोलिक रचना साहसवीरांना भुरळ पाडणारी. उंच-सखल भाग असल्यामुळे येथील रस्त्यांची रचनाही चढ-उतार अशा स्वरूपाचीच; मात्र याचाच फायदा होऊ शकतो साहसी ‘सायकल रायडिंग’साठी!सातारा येथे स्वातंत्र्यदिनी शुक्रवार, दि. १५ आॅगस्ट रोजी ‘सायकल क्रांती’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. यासाठी अमर सायकल एजन्सीच्या आशिष जेजुरीकर या तरुणाने पुढाकार घेतला आहे. आपल्याकडे सायकल चालविणे कमीपणाचे मानले जाते. मात्र, मोटारसायकल आणि सायकल यामध्ये सर्वात मोठी तफावत काय असेल तर मोटारसायकलीमुळे प्रदूषणात भर पडते; पण सायकल चालविण्यामुळे पर्यावरणाचे काहीच नुकसान होत नाही. शिवाय सायकलमुळे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. साताऱ्यातील युवकांना रायडिंगची आवड आहे. त्यांच्या या आवडीचे खेळात रुपांतर झाले तर सायकल रायडिंगमध्ये चांगले खेळाडू तयार होऊ शकतात, असा विचार आता पुढे येऊ लागला आहे. यासाठी साताऱ्यातील तरुणांचा ग्रुप सायकल क्रांती उपक्रमांतर्गत काम करत आहे. त्यांना योग्य मार्गदशन मिळावे, यासाठी सायकल क्लब स्थापन होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा युवकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)