शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची पाठ; टपऱ्या कुलपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST

सातारा : हातावर पोट असणाऱ्या लोकांना कोरोना महामारीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पंचायत समितीजवळच्या रस्त्यावर टपऱ्यांमध्ये फळ ...

सातारा : हातावर पोट असणाऱ्या लोकांना कोरोना महामारीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पंचायत समितीजवळच्या रस्त्यावर टपऱ्यांमध्ये फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना टपऱ्यांना कुलूप लावून बसावे लागले आहे.

सातारा शहरात जागोजागी गाडे उभे करून फळांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेने पंचायत समिती आणि बांधकाम विभाग यांच्या मधल्या रस्त्यावर असणाऱ्या फुटपाथवर बसण्याची सक्ती केली आहे. मात्र, या ठिकाणी विक्री कमी होत असल्याने विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.

आता गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे अनेकांना घरी बसावे लागले. गाठीशी जेवढा पैसा होता तोदेखील खर्च झाल्याने अनेकांच्या कडे भांडवल उरलेले नाही. भांडवल नसल्याने फळ विक्रीची दुकाने पुन्हा सुरू करता येत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवलेली आहेत.

दरम्यान, ज्यांची दुकाने सुरू आहेत, त्यांच्याकडे ग्राहक फिरकत नाहीत. त्यामुळे फळ विक्री होत नाही. ही फळे कालांतराने खराब होत असल्याने फळविक्रेत्यांचे हाल होत आहेत. सातारा शहरात रस्त्यावर कुठेही फळ विक्री करायची म्हटली तरी पालिका तसेच वाहतूक शाखा कारवाई करत असल्याने हे विक्रेते दिलेल्या जागेत ग्राहकांची वाट बघत बसलेले पाहायला मिळतात.

टपऱ्या बंद असल्या तरी पालिकेला पैसे द्यावेच लागतात. दिवसाकाठी पालिका तीस रुपये भाडे वसूल करते, यातून सुटका नाही. कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत व्यवसायाचे काही खरे नाही.

- लक्ष्मण निकम, फळ विक्रेता

फोटो ओळ : सातारा येथील पंचायत समितीजवळच्या रस्त्यावर असलेल्या फुटपाथवर या टपऱ्या ग्राहकाविना बंद ठेवण्यात येत आहेत. (छाया : सागर गुजर)