शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा कर्जयोजना होणार सक्षम

By admin | Updated: December 31, 2015 00:32 IST

बँकांतर्फे ग्वाही : ‘युक्रांद’च्या हलगी आंदोलनास यश

सातारा : मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवकांना जास्तीत जास्त लाभ मिळण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक सक्षम करण्यात येईल आणि तशा सूचना सर्व बँकांना दिल्या जातील, असे आश्वासन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांनी दिले आहे. यासंदर्भात मंगळवारी (दि. २९) युवक क्रांती दलातर्फे हलगी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन यशस्वी झाल्याचे ‘युक्रांद’ने म्हटले आहे.कर्ज मागण्यास गेलेल्याचे खच्चीकरण करणे, परस्पर विमा उतरवून कर्जखात्यात टाकणे, शासनाच्या दरानुसार व्याज न घेता मनमानी आकारणी, पूर्वी माफ झालेल्या कर्जांची काही वर्षांनी पुन्हा वसुली, कर्जदारावर ग्राहक न्यायालयात खटले भरणे, माफ झालेल्या कर्जांबाबत महामंडळाकडून कर्जमाफीपत्र आणण्यास सांगणे तसेच पंतप्रधान मुद्रा योजना व इतर योजनांबाबत सहकार्य न करणे असे आरोप ‘युक्रांद’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले होते. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला होता. दरम्यान, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर मुद्रा योजनेअंतर्गत अधिक चांगले काम करण्याच्या सूचना राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात येतील, असे आश्वासन शिरोळकर यांनी दिले. तसेच कोणत्याही बँकेबद्दल तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. ‘जिल्ह्यात या योजनेअंतर्गत चांगले काम सुरू आहे. डिसेंबरमध्ये तालुकास्तरीय बैठकीत सर्व बँकांना या योजनेतील कर्जवाटप करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २२ रोजी नियोजन भवनात झालेल्या बैठकीतही सूचना केल्या आहेत, असे शिरोळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)